सातारा : छत्तीसगडच्या जंगलात तब्बल पाच दिवस डांबून ठेवण्यात आलेल्या कऱ्हाडच्या दोन धाडसी तरुणांसह तिघांनी स्वत:च्या बुद्धिचातुर्याने या बंदिवासातून सुटका केली. आता आपापल्या गावी परतलेल्या या तिघांचा आत्मविश्वास काडीमात्रही डळमळीत झालेला नाही. ‘बचेंगे तो और भी घुमेंगे’ या भाषेत त्यांनी आपला निर्धार ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. कऱ्हाडच्या कोयना वसाहतीत राहणारे श्रीकृष्ण शेवाळे अन् आदर्श पाटील हे दोघे जीवलग मित्र. त्यांचाच अजून एक कॉमन फ्रेंड म्हणजे पुण्याचा विकास वाळके.तिघेही ग्रॅज्युएट . या तिघांनाही नाद स्वच्छंदीपणे फिरण्याचा. २५ डिसेंबरपासून त्यांनी गडचिरोली ते विशाखापट्टणम् असा एक हजार किलोमीटर सायकल प्रवासाचा प्लॅन आखला. छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात दाट झाडी सुरू झालेली. घनदाट जंगलातला किर्रर्रऽऽ अंधार अनुभवत सुनसान रस्त्यावरून सायकली पळू लागलेल्या असताना स्थानिक आदिवासींच्या मदतीने या पट्टयातील नक्षलवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं. ..अन् इथूनच सुरू झालं होतं.त्यांच्या पाच दिवसांच्या ‘बंदीवासा’चं अघोरी जिणं. तब्बल पाच दिवस त्या ठिकाणी नेमकं काय काय घडलं, हे ‘लोकमत’कडे सांगताना आजही त्यांच्या अंगावर जणू काटा होता. (प्रतिनिधी)‘लोकमत’च्या आजच्या ‘आॅक्सिजन’ पुरवणीत तो थरारछत्तीसगडच्या जंगलात एकजण झेपावला. तिघांचे खिसे उलटे केले गेले. ‘गुगलचा मॅप’ बाहेर पडला. छत्तीसगडमधल्या काही गावांभोवती त्यांनी फुल्या मारून ठेवल्या होत्या. हे पाहताच रायफलधारी नक्षलवाद्याचे डोळे अधिकच विस्फारले गेले. ‘इधर क्यूं आया? किसने भेजा है?’ या दोनच प्रश्नांचा भडीमार त्यानं सुरू केला. ‘आपण पोलिसांचे हस्तक आहोत,’ असा दाट संशय यांना आलाय, हे लक्षात येताच तिघेही पार हादरले... तीन मराठी लेकरांच्या आयुष्यातील ‘त्या’ पाच दिवसांच्या थरारक प्रसंगाची उत्कंठावर्धक कहाणी आजच्या ‘लोकमत’मधील ‘आॅक्सिजन’ पुरवणीत...
बचेंगे तो और भी घुमेंगे...
By admin | Published: January 14, 2016 11:50 PM