मुंबई : रेल्वेचे तिकीट आरक्षण रद्द केल्यास प्रवाशांच्या खिशाला आता दुपटीने कात्री लागणार आहे. रेल्वे मंत्रालयातर्फे हा निर्णय घेण्यात आला असून, नव्या नियमाची अंमलबजावणी १२ नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहेनव्या नियमानुसार प्रवासाच्या चार तास आधीच्या कालावधीत तिकिट रद्द केल्यास परतावा मिळणार नाही. प्रवासाच्या आधी १२ ते ४ तास या कालावधीत प्रवाशांना तिकिटाच्या ५0 टक्के रकमेला मुकावे लागणार आहे. प्रवासाच्या आधी ४८ ते १२ तास कालावधीत आरक्षण रद्द करायचे असल्यास प्रत्येक प्रवाशाच्या तिकीट शुल्कातून २५ टक्के रक्कम कापली जाणार आहे.दर्जाकपात रक्कमवातानुकूलित फर्स्ट क्लास२४०वातानुकूलित टू टायर२००वातानुकूलित थ्री टायर/एसी चेअर कार१८०स्लीपर क्लास१२०सेकंड क्लास ६०आकडे रुपयांमध्ये
आरक्षण रद्द केल्यास दुप्पट किंमत मोजा
By admin | Published: November 07, 2015 1:15 AM