सोलापूर: सध्या देशभरात तसेच महाराष्ट्रात अनेकांवर ईडी आणि सीबीआयचे छापे पडत आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्या विरोधात ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवा असे बोलत थेट त्यांनी सरकारलाच आव्हान दिले आहे. सोलापूरच्या दौऱ्यावर आसताना सुप्रिया सुळे 'संवाद ताईंशी' या कार्यक्रमात बोलत होत्या.
तसेच सुप्रिया सुळेंनी सध्या सोलापूर संवाद दौऱ्यावर असून 'संवाद ताईंशी' या कार्यक्रमाद्वारे शनिवारी सोलापूरमधील विविध समाजातील क्षेत्रातील व्यक्तीबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत सरकार विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप करत माझ्या विरोधात ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवा असे बोलत सरकारलाच ओपन चॅलेंज त्यांनी दिले आहे.
सरकार ईडी आणि सीबीआयला हाताशी धरुन सूडबुद्धीने कारवाई करत आहे, असा आरोप अनेक विरोधक भाजप सरकारवर करत आहेत. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणात ईडीने चौकशीसाठी बोलवलं होतं. तसेच माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनाही आयएनएक्स मीडियातील कथित घोटाळ्याच्या आरोपात सीबीआयने अटक केली आहे.