नागपूर : देशातील कृषी क्षेत्राची आजची परिस्थिती लक्षात घेता अनेक ठिकाणी नवीन जलसिंचन प्रकल्पांची आवश्यकता आहे. परंतु त्यात भूमी संपादनाचा अडथळा येत आहे. जमीनच मिळाली नाही तर एकही नवा प्रकल्प उभारताच येऊ शकणार नाही, असे मत केंद्रीय जलसंपदा व नदी विकास मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केले.देशात सध्या भूमी संपादन विधेयकाबाबत विविध प्रकारच्या नकारात्मक बाबी पसरविण्यात येत आहेत. हे विधेयक देशाला प्रगतीकडे घेऊन जाणारे आहे. या विधेयकातील काही नियम जर राज्य सरकारांना पटणारे नसतील तर त्यात बदल करण्याचा त्यांना अधिकार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे हे विधेयक असताना त्याला विरोध का, असा प्रश्न त्यांनी केला.काँग्रेसचे नेते कुठल्याही विषयाचा अभ्यास न करता केवळ द्वेष भावनेतून खोटे बोलतात. राहुल गांधी यांनी योग्य अभ्यास करून मगच बोलावे, असे त्या म्हणाल्या.संजय जोशींबाबत मौनसंजय जोशींच्या घरवापसीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या मुद्यावर मी काहीही बोलणे योग्य होणार नाही असे सांगून त्यांनी मौन साधले.
जमीन न मिळाल्यास नवा प्रकल्प होणार नाही
By admin | Published: April 23, 2015 5:34 AM