ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १८ - स्वच्छ भारत मिशन अंतर्गंत शासनाच्यावतीने शौचालयाबाबत जनजागृती करुन स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात असतानाही काही गावांतील नागरिक आजही उघडयावर शौचास जात आहे. रिसोड तालुक्यातील हराळ येथील एका शेतक-याने तर चक्क कंटाळून शेतासमोर ‘ शौचाला पुढे जावू नये अपमान होईल’ असे फलकच लावून दिले आहे. या फलकाची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.
जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रमाव्दारे एकीकडे जिल्हयात उघडयावर शौचास बसू नये याकरीता उपाय योजना, जनजागृती पर्यायी दंड सुध्दा आकारण्यात येत आहे. एवढे करुन सुध्दा काही गावातील नागरिक याला बगल देत आपली दिनचर्या उघडयावर उरकत आहेत. रिसोड तालुक्यातील हराळ येथील एका शेतकºयाचे शेत गावानजिक असल्याने अनेकजण त्यांच्या शेताकडे शौचास जातात. वारंवार सांगूनही कोणीच ऐकत नसल्याने अखेर त्या शेतकºयाने चकक एका झाडावर फलक लावून एकप्रकारे अपमान करण्याचा इशाराचं दिला आहे. जिल्हा परिषदेच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या मोहीमेंतर्गंत या गावाला भेट देवून जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.