मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या काळात दिल्लीत शिवसेना संपविण्याची भाषा केली गेली. आमच्या अस्तित्वाशी लढायचे असेल तर थेट मैदानात उतरा, कपट-कारस्थाने कसली करता, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी भाजपाला थेट आव्हान देत मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला हुकूमशाहीकडे नेत असल्याचे टीकास्त्रही उद्धव यांनी सोडले.वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शिवसेनेचा राज्यव्यापी पदाधिकारी मेळावा झाला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली. देशात चीनप्रमाणे हुकूमशाही येतेय की काय असे वाटू लागले आहे. मात्र, आमचे स्वातंत्र्य गमावून विकास आम्हाला नको. तसा विकास तर ब्रिटिशांनीही केला होता. हा देश असली हुकूमशाही स्वीकारणार नाही, अशा शब्दांत उद्धव यांनी मोदी यांच्या धोरणांचा समाचार घेतला.उद्धव म्हणाले की, केवळ आश्वासने आणि घोषणा देऊन जनतेला भुलवले जात आहे. निवडणुकांच्या ‘जुमल्यां’वरच यांचे ‘इमले’ उभे राहिले आहेत. नोटाबंदीला जनतेचा पाठिंबा असल्याचे फक्त भासवले जात आहे. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीनंतर ज्या योजना जाहीर केल्या त्या जुन्याच आहेत, राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी ही गत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. लोक जिवंत आहेत, हेच अच्छे दिन समजायचे का, असा तिरकस प्रश्नही उद्धव यांनी विचारला. जिल्हा बँकेत भ्रष्टाचार होईल म्हणून नोटाबंदीनंतर त्यांना टाळे लावले. मोठ्या बँकांनी पैसे बुडवले, शिक्षा मात्र जिल्हा बँकांना. ललित मोदी, विजय मल्ल्यासारखी मंडळी पळाली तेव्हा तुम्ही झोपा काढल्या का, असा बोचरा सवालही उद्धव यांनी केला. (प्रतिनिधी)सर्वोच्च न्यायालयाने जात, धर्म आणि भाषेच्या आधारावर मत मागता येणार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. त्याचा उल्लेख करत हिंदुत्व आमची ओळख आणि चेहरा आहे आणि आम्ही तो सोडणार नाही. तसेच लाचार होऊन युती करणार नाही आणि युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर असला प्रकारही मान्य नाही. शिवसैनिकांनी धनुष्यावरच लढायला हवे, असे उद्धव म्हणाले.नोटाबंदीला जनतेचा पाठिंबा असल्याचे फक्त भासवले जात आहे. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीनंतर ज्या योजना जाहीर केल्या त्या जुन्याच आहेत, राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी ही गत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. लोक जिवंत आहेत, हेच अच्छे दिन समजायचे का, असा तिरकस प्रश्नही उद्धव यांनी विचारला. केंद्रीय अर्थसंकल्प रोखाराष्ट्रपतींनी अर्थसंकल्प फेब्रुवारीत मांडण्यापासून केंद्र सरकारला रोखावे. पाच राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच फेब्रुवारीत अर्थसंकल्प सादर करण्याचा डाव आहे. अर्थसंकल्पातून आश्वासनांची भूल पाडण्यात मोदी यशस्वी होतील. त्यामुळे सेना खासदारांनी राष्ट्रपतींना अर्थसंकल्प निवडणुकांपूर्वी तो सादर होऊ न देण्याची मागणी करावी, असा आदेश उद्धव यांनी दिला.
हिंमत असेल तर दोन हात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2017 5:18 AM