ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - छापील एमआरपी किंमती पेक्षा जास्त रक्कम वसूल करणारे दुकानदार आणि हॉटेल्स विरोधात ग्राहकांना आता थेट व्हॉट्स अॅपवरुन तक्रार दाखल करता येणार आहे.
नागरीकांना आता दुकानात अथवा हॉटेलमध्ये असा फसवणुकीचा अनुभव आला तर, ग्राहकांनी थेट ९८६९६९१६६ किंवा ०२२-२२८८६६ या क्रमांकांवर सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाचवाजेपर्यंत व्हॉट्स अॅपवरुन तक्रार नोंदवावी असे राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने सांगितले.
तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. लोकांच्या माहितीसाठी वरील क्रमांक प्रसिध्द करणे दुकानदार, हॉटेल्सना बंधनकारक करण्याचा विचार आहे. चोवीस तास हा दूरध्वनी क्रमांक सुरु ठेवण्याचा सरकारचा विचार आहे.