शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

वाहतूक नियमांचे उल्लंघन कराल तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2017 12:30 AM

वाहनचालकांवर सीसीटीव्हीची करडी नजर राहणार असून, ई-चलान यंत्रणेद्वारे वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे.

पुणे : आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन कराल तर सावधान! झेब्रा क्रॉसिंग, नो पार्किंग, विनाहेल्मेट, फॅन्सी नंबरप्लेट, ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग अशा कोणत्याही प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीची करडी नजर राहणार असून, ई-चलान यंत्रणेद्वारे वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक शाखेने बुधवारपासून आयटी सोल्यूशन्स कंपनीच्या सहकार्याने सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर ही सेवा कार्यान्वित करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या वर्षभरात विविध अ‍ॅप, नवीन संकेतस्थळाद्वारे स्मार्ट होत असलेल्या पुणे पोलिसांची वाहतूक शाखाही आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सज्ज झाली असून, दंडवसुलीसाठी, ‘ई-चलान’ या सेवेच्या कारवाईत्मक अस्त्राची निर्मिती केली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील वेगवेगळ्या चौकांमध्ये एकूण १२३६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, त्यामध्ये २१७ पीटीझेड कॅमेऱ्यांचा समावेश आहे.चौकात वाहनचालकाच्या हालचालींवर वाहतूक कार्यालयातील सीसीटीव्ही युनिटमधून निगराणी ठेवली जाणार आहे. एखाद्या वाहनचालकाने नियमभंग केल्यास त्याच्या छायाचित्रासह संपूर्ण माहिती संगणकीय सॉफ्टवेअरद्वारे संकलित होऊन वाहनचालकाला त्याबाबतचा एसएमएस पाठविला जात आहे.(प्रतिनिधी)सध्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांकडून छायाचित्रासह माहिती पाठविली जात आहे. मात्र लवकरच नागरिकांकडून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांची छायाचित्रे आणि माहिती मागविली जाणार असून, अशा वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे डॉ. मुंढे यांनी सांगितले.या एसएमएसद्वारे दंडाची रक्कम भरण्याकरिता वाहनचालकाला लिंक पाठविली जात असून, त्या लिंकवर त्याला त्याच्या गाडीचा नंबर, चलन क्रमांक टाकल्यावर गुन्ह्याची माहिती मिळू शकणार आहे .वाहनचालक दंडाची रक्कम स्र४ल्ली३१ाां्रूङ्मस्र.ल्ली३ या संकेतस्थळावर आॅनलाईन पद्धतीने, चौकातील ई-चलन मशिनवर कार्ड स्वाईप करून किंवा रोख रक्कम भरावयाची झाल्यास जवळच्या वाहतूक विभागात किंवा व्होडाफोन स्टोअरमध्ये जाऊन भरू शकतात, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.चौकामध्ये सर्वप्रकारच्या वाहतूकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याकरिता एकूण २०० ई-चलन डिव्हाईसचा वापर करण्यात येत आहे. आगामी काळात या डिव्हाईसमध्ये दुपटीने वाढ केली जाणार आहे. वाहनचालकाने यापूर्वी किती वेळा वाहतुकीच्या नियमांचा भंग केला आहे, याची संपूर्ण माहिती जागीच डिव्हाईसमध्ये पाहाण्याची सोयही उपलब्ध आहे. वाहतूक शाखेकडे सात लाख वाहनचालकांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध आहेत. रक्कम भरली नाही तर समन्सवाहनचालकाने आॅनलाईन पद्धतीने दंडाची रक्कम भरल्यास एक दिवसाने वाहतूक शाखेला ती रक्कम प्राप्त होणार आहे. सात दिवसांत वाहनचालकाने रक्कम न भरल्यास त्याला कोर्टातून समन्स पाठविणे, आरटीओकडे त्याची संपूर्ण माहिती पाठविली जाणार आहे़ त्यामुळे गाडीचे कोणतेही व्यवहार करण्यास त्याला अडथळा आणला जाईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.