इगतपुरी (जि. नाशिक) - ‘गुजरातसाठी धरण, आदिवासींसाठी मरण हे चालणार नाही, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणा देत २५ ते ३० हजार शेतकºयांचा ‘लॉँग मार्च’ गुरुवारी सकाळी घाटनदेवीपासून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला. १२ मार्चला मोर्चा मुंबईत पोहचल्यावर विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार आहे.राज्य किसान सभेच्यावतीने कॉ. जिवा पांडू गावित, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे, कॉ. अजित नेवले यांच्या नेतृत्वाखाली नाशिकहून शेतक-यांच्या लॉँग मार्चला प्रारंभ झाला. वन हक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, देवस्थान आणि इनामी जमिनी कसणाºयांनाच द्याव्यात, विनाअट सर्व शेतकºयांना कर्ज मुक्ती द्यावी, वीज बिल माफ करावे, दुष्काळग्रस्त भागात दमण गंगा, नार- पार योजनेचे पाणी द्यावे, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी हा लॉँग मार्च काढण्यात आला आहे.या मोर्चात महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, सांगली, सातारा, येथील शेतकरी सहभागी झाले असून प्रत्येक मुक्कामानंतर या संख्येत भर पडत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी रात्री घाटनदेवी परिसरात मुक्काम केल्यानंतर मार्गक्रमित झालेले मोर्चेकरी गुरुवारी सायंकाळी मुक्कामासाठी कळमगाव येथे थांबले आहेत.फडणवीस सरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकºयांचे बळी जात आहेत. त्या निषेधार्थ व शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यत मुंबई सोडणार नाही.- कॉ. विलास बाबरपालघर जिल्ह्यातील डहाणू येथील शेतकरी बांधवांची अवस्था दयनीय झाली आहे. कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आज महिला दिनी गरीब शेतकºयांना न्यायाकरिता रस्त्यावर उतरावे लागले, ही दुर्दैवी बाब आहे.- रु पाली राठोड,जनवादी महिला संघटक, डहाणू
इगतपुरीकडून ‘लॉँग मार्च’ची मंत्रालयाकडे कूच, किसान सभा; विधिमंडळाला घालणार घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 3:20 AM