शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘आयआयएम’ नागपूर की औरंगाबाद?

By admin | Published: December 14, 2014 12:46 AM

‘आयआयएम’ची (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) स्थापना नेमकी कुठल्या शहरात होणार, याबाबतच्या निर्णयाची नागपूर व औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींना प्रतीक्षा आहे. आजच्या तारखेत या शर्यतीत

शासनाचे मौन : अधिवेशनात मुद्दा तापण्याची चिन्हेयोगेश पांडे - नागपूर‘आयआयएम’ची (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) स्थापना नेमकी कुठल्या शहरात होणार, याबाबतच्या निर्णयाची नागपूर व औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींना प्रतीक्षा आहे. आजच्या तारखेत या शर्यतीत नागपूर आघाडीवर असले तरी औरंगाबादचे लोकप्रतिनिधी तसेच उद्योजकांनी यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने मात्र यासंबंधात मौन साधले असून योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने राज्यात ‘आयआयएम’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरांचा विचार करण्यात आला. मुंबई, पुणे या शहरांत जागेची वानवा असल्यामुळे औरंगाबाद आणि नागपूरपैकी एका शहराची निवड होण्याची शक्यता आहे. नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी जागेची उपलब्धता आहे. नागपुरात मिहान येथील २०० एकर जागेचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला.दोन्ही शहरांचा दावादुसरीकडे औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील स्वतंत्र इमारत देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. शिवाय येथील अब्दीमंडी, करोडी तसेच ‘डीएमआयसी’साठी संपादित केलेल्या जागेचा प्रस्तावही शासनाला पाठविण्यात आला आहे. नागपुरात आजच्या तारखेत ‘व्हीएनआयटी’ सोडले तर मोठे शैक्षणिक केंद्र नाही. ‘ट्रिपल आयटी’, ‘महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटी’, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्था अद्याप कागदावरच आहेत. परंतु केंद्र व राज्यातील सत्ताबदलानंतर नागपूरचे राजकीय वजन वाढले आहे. शिवाय येथे दळणवळणाच्या सोयी सहजपणे उपलब्ध आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच शहर असल्याने उपराजधानीची बाजू उजवी दिसून येत आहे. दुसरीकडे ‘आयआयएम’ औरंगाबादलाच व्हावे, यासाठी मराठवाड्यातील उद्योजकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री, केंद्रातील विविध मंत्र्यांच्या भेटी घेण्यात आल्या. शैक्षणिक अनुशेष मराठवाड्यातही आहे. येथे राष्ट्रीय दर्जाची शैक्षणिक संस्था आली तर परिसराचा विकास होण्यास मदत होईल, अशी भूमिका आहे. यासंदर्भात रविवारी औरंगाबादमध्ये जनप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे सदस्य, कार्यकर्ते उपोषणाला बसणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विधिमंडळात गाजणार मुद्दा‘आयआयएम’नेमके कुठल्या शहरात जाईल, यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना विचारणा केली असता त्यांनी यावर ठोस उत्तर देण्यास नकार दिला. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही. परंतु लवकरच प्रतीक्षा संपेल, असे त्यांनी स्पष्ट केले. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात ‘आयआयएम’संदर्भात विधिमंडळात आवाज उपस्थित करण्याचा दोन्ही शहरातील जनप्रतिनिधींचा प्रयत्न राहणार आहे.