प्रदूषण, सरकारी तिजोरीवर पडणारा भार आदी समस्यांमुळे केंद्र सरकार इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, या वाहनांची रेंज आणि किंमत मोठी अडचण आहे. तसेच चार्जिंग स्टेशनही जवळपास नाहीतच. अशा अनेक अडचणींमुळे इलेक्ट्रीक वाहनांचा काळ येण्यास मोठा अवधी जाणार आहे. मात्र, यावर आयआयटी मुंबई (IIT) आणि शिव नादर विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी असे तंत्रज्ञान शोधून काढले आहे की, एका चार्जिंगमध्ये ही बॅटरी असलेले वाहन तब्बल 1600 किमीचे अंतर कापणार आहे.
सध्या ह्युंदाईकडे 1000 किमीचे अंतर कापणारी कार आहे. मात्र, टाटा, महिंद्रासह अन्य कंपन्यांकडे 100 किमीच्या आसपास किंवा त्याहून अधिक रेंजच्या कार आहेत. टाटा नेक्स़ॉन 300 किमीची रेंज देते. यापुढे काही अद्याप तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. या बॅटरींमध्ये लिथिअम आयन वापरले जाते. यापेक्षा पर्यावरणाला अनुकुल असे लिथियम-सल्फर (Li-S) च्या बॅटरींचे उत्पादन घेतले जाऊ शकते. असे तंत्रज्ञान आयआयटीने विकसित केले आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार संशोधकांनी लिथिअम आयनच्या तुलनेत तिप्पट ऊर्जा देणारी बॅटरी तयार केली आहे. ही Li-S बॅटरी पेट्रोलियम रसायनची उत्पादने जसे की सल्फर, कृषी टाकाऊ वस्तू आदींच्या वापरातून बनविण्यात येऊ शकते. शिव नादर विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक बिमलेश लोखब यांनी सांगितले की, हे संशोधन एक उपाय शोधण्यासाठी हरित रसायन विज्ञानाच्या सिद्धांताला केंद्रीत करते. याद्वारे बनविलेली बॅटरी तिप्पट ते चौपट ऊर्जा क्षमतेसह सुरक्षा व स्वच्छ स्रोत आहे.
सध्याच्या काळात एखादी कार 400 किमीचे अंतर एका चार्जिंगवर पार करत असेल तर या बॅटरीची कार एका चार्जिंगवर 1600 किमी अंतर कापेल. म्हणजेच ही कार एका चार्जिंगमध्ये मुंबई ते दिल्ली अंतर कापेल. या बॅटरीवर निश्चितच वाहन निर्मात्या कंपन्यांच्या उड्या पडणार आहेत. कारण सध्या कोणत्याही कंपनीकडे एवढी मोठी रेंज देणारे तंत्रज्ञान नाहीय. तसेच भारतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजाराची मागणी लक्षात घेता उद्या अशा प्रकारच्या बॅटरीलाच मोठी मागणी राहणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus News चीनला भिडला! छोट्याशा देशाने कोरोनावर लस बनविली; साईड इफेक्ट शून्य
एकटीला पाहून साधुने बलात्काराचा प्रयत्न केला; मार्शल आर्ट मास्टर महिलेने धु धु धुतले
सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण; झाले क्वारंटाईन
किम जोंग उन जिवंत! बोलावली आपत्कालीन बैठक; उत्तर कोरियाकडून पुन्हा फोटोद्वारे 'दर्शन'
CoronaVirus News लस टोचल्यानंतरही कोरोनाची लागण होणार? तेलंगानातील रिपोर्ट चिंता वाढविणारा
CoronaVirus News: गंभीर इशारा! थंडीत लस अशक्य; पण कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता
कौन बनेगा? तुम्ही देखील बनू शकता करोडपती; रोज फक्त 30 रुपये बाजुला काढा