मुंबई : अवैध वाहतुकीविरोधात राज्याच्या परिवहन विभागाने कठोर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. २0१५ पासून कारवाईचा वेग वाढला असून मे महिन्यापर्यंत तब्बल ६३ हजार अवैध प्रवासी वाहनांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यात जवळपास २५ टक्के वाढ झाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहने धावत असल्याने सार्वजनिक वाहतूक सेवांवर त्याचा मोठा परिणाम होताना दिसतो. त्याचा सर्वात मोठा फटका एसटी महामंडळाला बसत असून प्रवासी आणि उत्पन्न कमी झाल्याची ओरड केली जाते. अवैध वाहतुकीमुळे तर कोट्यवधींचे उत्पन्न बुडत असल्याचे एसटी महामंडळाकडून सातत्याने सांगण्यात येते. एकूणच गांभीर्य लक्षात घेऊन आरटीओकडून २0१५ पासून अवैध वाहतुकीविरोधात कारवाईचा वेग वाढवल्याचे दिसते. अवैध प्रवासी वाहनांविरोधात कारवाई करण्यासाठी सध्या राज्याकरिता आरटीओकडे ५९ वायुवेग पथके आहेत. मोटार वाहनांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रस्त्यावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने आरटीओच्या वायुवेग पथकाच्या कामगिरीत वाढही झालेली आहे. २0१५ पासून ते २0१६ मे महिन्यापर्यंत करण्यात आलेल्या तपासणीत २ लाख ३४ हजार १७४ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६३ हजार ११५ अवैध प्रवासी वाहने असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याविरोधात केलेल्या कारवाईतून ३४ कोटी रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. २0१४-१५ मध्ये दोषी आढळलेल्या वाहनांचा आकडा हाच ३८ हजार ४0१ एवढा होता. त्यामुळे तुलनात्मक पाहता २५ टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)१ लाख ५३ हजार ३९९ वाहनांची तपासणी- आरटीओच्या ठाणे, सातारा, पुणे, नाशिक, वाशिम, पनवेल, पेण, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, लातूर, यवतमाळ विभागात सर्वाधिक कारवाई अवैध प्रवासी वाहनांविरोधात करण्यात आली आहे.- २00६-0७ साली जवळपास १ लाख ५३ हजार ३९९ वाहने तपासण्यात आली होती. त्यात ४१ हजार १५८ वाहने दोषी आढळली होती. हाच कारवाईचा आकडा आता वाढला आहे.- राज्यातील वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त वायुवेग पथके निर्माण करण्याचेही परिवहन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.
अवैध प्रवासी वाहतूकदारांची कोंडी
By admin | Published: September 25, 2016 12:47 AM