शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

अवैध प्रवासी वाहतूक जोरात

By admin | Published: May 19, 2016 2:25 AM

शहरातील गवळीवाडा या मध्यवर्ती ठिकाणी एसटीचे मोठे स्थानक आहे.

लोणावळा : शहरातील गवळीवाडा या मध्यवर्ती ठिकाणी एसटीचे मोठे स्थानक आहे. पूर्वी राज्यभरातील एसटी बसेस या स्थानकावर थांबत होत्या. यामुळे स्थानकाचा परिसर सतत गजबजलेला असायचा. आता मात्र एसटी अधिकाऱ्यांनी वलवण येथे बेकायदेशीरपणे दोन खासगी हॉटेलांना एसटीचे थांबे मंजूर केल्याने लांब पल्ल्यांच्या बसेस, तसेच निमआराम बस या शहरातील बसस्थानकावर न येता गावाबाहेरील या थांब्यावर थांबत असल्याने बसस्थानकात अनेक वेळा बसच नसतात. यामुळे प्रवासी हैराण होत असून, बसेस उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना जादा पैसे मोजून खासगी बसेस अथवा प्रवासी कारमधून प्रवास करावा लागत आहे. बसस्थानकात बसेस येत नसल्याने याचा फायदा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी घेतला आहे. पूर्वी स्थानकाच्या आवारात खासगी गाडी आणण्यासही बंदी असलेल्या ठिकाणी, तसेच कंट्रोल रूमच्या शेजारी सध्या गाड्या उभ्या करून प्रवासी खासगी वाहनांमधून पळविले जात असताना व्यवस्थापक व आगारप्रमुख बघ्याची भूमिका घेत आहेत. स्थानकातील या अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात २०१४ साली उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली असतानाही स्थानक परिसरातून अवैध प्रवासी वाहतूक खुलेआम सुरू आहे. याला एसटीचे अधिकारीच जबाबदार असल्याचे नागरिक सांगतात. (वार्ताहर)>एसटी स्थानकाच्या २०० मीटर परिसरात नो पार्किंग झोन मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत गवळीवाडा येथे लोणावळा बसस्थानक असून, हा परिसर सतत गजबजलेला असतो. महामार्ग, बसस्थानक व रेल्वे स्थानक याच ठिकाणी असल्याने अनेक टूरिस्ट स्टँड, रिक्षा स्टँड या परिसरात आहे. बस स्थानकाच्या २०० मीटर परिसरात ‘नो पार्किंग झोन’ करून वाहनांवर कारवाई करावी, अशी तळेगाव आगारप्रमुखांची मागणी असून, त्याबाबतचे पत्र, तसेच बस स्थानकाच्या परिसरात उभ्या राहणाऱ्या वाहनांचे क्रमांक एसटीच्या आगारप्रमुखांनी शहर पोलिसांना दिले आहेत. स्थानकाच्या हद्दीतून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे क्रमांक आम्ही कारवाईसाठी अहवाल तयार करून रोज देत असल्याचे तळेगाव दाभाडे आगाराचे प्रमुख माने यांनी सांगितले. पोलिसांनी मात्र या वाहनांच्या क्रमांकावर आक्षेप घेतला आहे. घरातील नागरिकांना सोडण्यासाठी अथवा घेण्यासाठी येणाऱ्या वाहनांचे क्रमांकही एसटी विभागाकडून कारवाईसाठी देण्यात येत असल्याचे शहर पोलीस सांगतात.एसटीच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या बाहेर खासगी हॉटेलांना थांबे दिल्यामुळे लोणावळ्यातील एसटी स्थानक तोट्यात चालले असून, याचे खापर अधिकारी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांच्या माथी फोडत असल्याचा या भागातील व्यावसायिक व वाहनचालकांचा आरोप आहे.खासगी वाहनचालक बस स्थानकाच्या आवारात येऊन अवैध प्रवासी वाहतूक करत असले, तर त्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार एसटीच्या अधिकाऱ्यांना आहेत. मात्र, एसटीचे अधिकारी येथे कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही. उलटपक्षी ही कारवाई पोलिसांनी करावी, असे सांगत हात वर करतात. त्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांच्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कारवाई न करणे, तसेच शहराबाहेर खासगी हॉटेलांना एसटीचा थांबा देणे, या भूमिकाच संशयास्पद आहेत.>कारवाईत राजकारण्यांचा हस्तक्षेप लोणावळ्यात निम्म्याहून अधिक प्रवासी वाहने खासगी असून, प्रवासी वाहतूक करण्याची त्यांना परवानगी नसतानाही अवैध वाहतूक सुरू आहे. या अवैध वाहनांच्या विरोधात महामार्ग व वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली की, काही राजकीय मंडळीच हस्तक्षेप करून कारवाई थांबवत असल्याचे आढळून येत आहे. राजकारण्यांचा वाढता हस्तक्षेप व खासगी वाहनचालकांसोबतचे आर्थिक हितसंबंध यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात लोणावळ्यात कारवाई होत नसल्याचे उघड सत्य आहे.