शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

Exclusive: 'मी कुणालाही घाबरत नाही, येत्या अधिवेशनात मोठा खुलासा करणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 4:29 PM

'भाजपचे लोक मला भंगारवाला म्हणतात, होय माझा भंगाराचा धंदा आहे आणि भंगारवाला असल्याचा मला अभिमान आहे.'

मुंबई: ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. नवाब मलिकसमीर वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप करत आहेत. या प्रकरणात अनेक भाजप नेत्यांनीही नवाब मलिक आणि सरकारवर टीका केलीये. या सर्व प्रकरणावर नवाब मलिक यांनी लोकमतशी सविस्तर चर्चा केली. 

अधिवेशनात मोठा खुलासा करणारयावेळी नवाब मलिक म्हणाले, भाजपचे अनेक नेते माझ्यावर टीका करत आहेत. पण, मी त्यांना आता काहीच उत्तर देणार नाही. माझ्याकडे अनेक नेत्यांच्या मोठ्या प्रकरणांची कागदपत्रे आहेत. येत्या अधिवेशनात या सर्व प्रकरणावर मोठा खुलासा करेल. मी कुणालाही घाबरत नाही. मी माझ्या बोलण्यावर ठाम. अधिवेशनात यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशी जहरी टीका मलिकांनी यावेळी केली. 

होय मी भंगारवाला आहेमलिक पुढे म्हणाले की, भाजपचे लोक मला भंगारवाला म्हणतात. होय माझा भंगाराचा धंदा आहे आणि भंगारवाला असल्याचा मला अभिमान आहे. माझं कुटुंब आजही भंगाराचा व्यवसाय करत आहे. तुम्ही आजही तिथे जाऊ शकता. त्यात लपवण्यासारखं काहीच नाही. पण, या लोकांना भंगारवाल्याची किमया अजून माहीत नाही. भंगारवाला निरुपयोगी गोष्टी जमा करतो. भंगाराचे तुकडे करतो आणि मग ते भट्टीत टाकून त्याचं पाणी पाणी करतो. या शहरात असलेल्या सगळ्या भंगारांचे तुकडे तुकडे करून भट्टीत टाकून त्यांचं पाणी पाणी केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं म्हणत मलिकांनी भाजप नेत्यांना सूचक इशारा दिला.

बॉलिवूडला युपीत नेण्याचा डावनवाब मलिक यावेळी म्हणाले, मागील काही वर्षांपासून काही लोकांकडून बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरुये. या बॉलिवूडमुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो, या इंडस्ट्रीचा देशाच्या जीडीपीमध्ये 2-3 टक्के वाटा आहे. पण, काहीजण बॉलिवूडला ड्रग्सचा अड्डा असल्याचं भासवत आहेत आणि या बॉलिवूडला इतर राज्यात पळवण्याचा प्रयत्न करताहेत. मागे एकदा भाजपच्या जवळच्या काही लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. योगींनी युपीवूड सुरू करण्याची घोषणा केलीये, त्यामुळे मुंबईतील इंडस्ट्री तिकडे हलवण्याचा डाव काहीजण आखत आहेत. पण, त्यांचा हा डाव कधीच पूर्ण होणार नाही. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोBJPभाजपा