शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

मी स्वत:ला ‘फॅशन आयकॉन’ समजत नाही  : अमृता फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 5:51 PM

मी स्वत:ला ‘फॅशन आयकॉन’ समजत नाही. परंतू माझ्याकडून लोकांना प्रेरणा मिळावी असे मला वाटते असे मत अमृता फडणवीस यांनी पुण्यात व्यक्त केले. 

पुणे :  मी स्वत:ला ‘फॅशन आयकॉन’ समजत नाही. परंतू माझ्याकडून लोकांना प्रेरणा मिळावी असे मला वाटते असे मत अमृता फडणवीस यांनी पुण्यात व्यक्त केले. 

खास महिलांसाठी  दागिने व कपड्यांच्या  ’कुटूर’ या प्रदर्शनाचे उदघाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवादसाधला.  या वेळी प्रदर्शनाच्या आयोजक स्मितादेवी पटवर्धन,नैना मुथा, खासदार वंदना चव्हाण, आमदार माधुरी मिसाळ, उषा काकडे आदि उपस्थित होत्या. ‘फँशन आयकॉन’ अशी तुमची एक प्रतिमा निर्माण झाली आहे, त्याबददल विचार व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, व्यक्तिमत्व  खुलवण्यासाठी कपडे आणि फॅशन मदत करत असले तरी आत्मविश्वासही व्यक्तिमत्त्वातील सर्वांत आवश्यक गोष्ट आहे. माझे अनेक कपडे ‘एनआयएफटी’ संस्थेच्या फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी डिझाईन केलेले आहेत. त्यातून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते याचा मला आनंद आहे. 

ट्रोलिंगमधून कोणीही सुटत नाही 

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग केले जाते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका होते, या ट्रोलिंगकडे कशापद्धतीनेपाहाता  याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठीच आपण समाजमाध्यमांवर व्यक्त होत असतो आणि या माध्यमांवर‘ट्रोलिंग’पासून कोणीही सुटत नाही. हे ट्रोलिंग आपण कसे घेतो ते महत्त्वाचे आहे. ट्रोलिंगमधील महिलांसाठी अवमानकारक आणि दहशत पसरवूपाहणा-या पोस्ट मात्र निश्चित निंदनीय असून त्या थांबायला हव्यात. या बाबतीत गरज पडल्यास सायबर कायद्यांची मदत घ्यावी. मुख्यमंत्री देखील होणारी टीका सकारात्मक घेऊन त्याची दखल घेत  सर्वसमावेशक चचेर्तून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात.  

लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना हवे कडक शासन 

समाजात लहान मुला-मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना संतापजनक असून, पुरूषांमधील ही दानवी वृत्ती मारायला पाहिजे. बालकांवर अत्याचार करणा-या आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे अशा शब्दात त्यांनी लहान मुलांवरील गंभीर घटनांवर बोट ठेवले.

स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात आवाज उठवण्याची गरज 

आज समाजातच नव्हे तर कुटुंबांमध्येही महिलांवर अत्याचार होत आहेत. आपले मूल्य आपल्याला  समजायला हवे. महिलांच्या सक्षमीकरणांसाठी आधी महिलांनी महिलांच्या पाठीशी उभे राहणे फार महत्त्वाचे आहे. महिलांबाबतची सामाजिक मानसिकता बदलणेआवश्यक असून, शिक्षण व मूल्यांच्या रुजवणुकीतून ते शक्य आहे.एकीकडे महिला प्रगतीपथावर जात आहेत तर दुसरीकडे त्या अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. महिलांवरील अत्याचारासंदर्भात एकत्रित आवाज उठविण्याची गरज आहे. महिलांच्या संदभार्तील गुन्ह्यांमध्ये दोषींना शिक्षा होण्याचा दर वाढला असून हे सुचिन्ह आहे. मुलगी झाल्यानंतर कन्या भाग्यश्री योजना वगैरे राबविल्या जात आहेत मात्र त्या वरवरच्या आहेत. मुलगी झाल्यानंतर काय? असा प्रश्न पडतो तेव्हा विविध क्षेत्रातील महिलांचे आदर्श पालकांच्या डोळ्यासमोर ठेवायला हवेत.

टॅग्स :PuneपुणेAmruta Fadnavisअमृता फडणवीसfashionफॅशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा