शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी

By admin | Published: January 11, 2017 4:46 AM

सार्वजनिक आरोग्य विभागात दुसरे एक संचालकपद निर्माण करणारा आदेश अखेर आरोग्य विभागाने काढला.

अतुल कुलकर्णी / मुंबईसार्वजनिक आरोग्य विभागात दुसरे एक संचालकपद निर्माण करणारा आदेश अखेर आरोग्य विभागाने काढला. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी लेखी आदेश देऊनही त्याच्या अंमलबजावणी फाइल जाणीवपूर्वक पुढे नेली जात नसल्याचे वृत्त लोकमतने प्र्रकाशित करताच हा आदेश काढण्यात आला आहे.सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य आयुक्तालय म्हणून ओळखला जाईल आणि संचालकाचे आणखी एक पद निर्माण करून त्यांच्या कामाचे वाटप करावे, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यानंतर १८ आॅक्टोबर रोजी त्यासंबंधीचे आदेशही निघाले. मात्र आता दोन महिने उलटून गेले तरीही त्या आदेशाची अंमलबजावणीच होत नव्हती. ही फाइल जाणीवपूर्वक रखडवली जात असल्याचे आरोप होत होते. सदरचे वृत्त लोकमतने ३ जानेवारी रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयानेदेखील याचा जाब आरोग्य विभागाला विचारला आणि ९ जानेवारी रोजी दुसरे संचालकांचे पद निर्माण करण्याचा आदेश निघाला.या निर्णयानुसार आता नवनिर्मित संचालक आरोग्य सेवा या पदाची कार्यकक्षा तसेच कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील, असेही त्यात म्हटले आहे. उद्यापासून पुण्यात राज्यातील सगळ्या आरोग्य अधिकाऱ्यांची तीन दिवसीय परिषद होणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव विजय सतबिरसिंग, आरोग्य आयुक्त डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हे अधिकारी मुंबईत आले की कामाच्या वाटपाची फाइल मुख्यमंत्री कार्यालयात पाठवली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुखपद आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याकडे द्यावे आणि त्यांच्या हाताखाली सहसंचालकांची चार पदे तयार करावीत, त्यांना कामांचे वाटप करून द्यावे ही रचना मुळात तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी मांडली होती. ज्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्त्वत: मान्यता दिली पण त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या लॉबीने लांबवली. त्यानंतर आरोग्य विभागातील २९७ कोटींच्या औषध खरेदीचे प्रकरण लोकमतने उघडकीस आणले. खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे सरकारने विधान परिषदेत लेखी प्रश्नोत्तरात मान्यही केले. आता संचालकांची दोन पदे निर्माण झाल्याने कामांचे वाटप विचारपूर्वक केले जाईल, असे स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकमतला सांगितले.