पुणे: राज्यात बहुतांश विभागात पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्यकता असून पावसाआभावी त्यांच्या वाढीवर परिणाम होवून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यातच नैसर्गिक आपत्ती शाखेकडील अहवालानुसार राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण १ लाख ४१ हजार २५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख ८ हजार २७९ हेक्टर उसाचे क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाले आहे. राज्याच्या कृषी विभागातर्फे पीक पेरणी व त्याच्या परिस्थितीचा २८ सप्टेंबरपर्यंतचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात १ जून ते २८ सप्टेंबर कालावधीमध्ये राज्यातील सरासरी पाऊस १ हजार ११७.८ मि.मी.असून २८ सप्टेंबरपर्यंत ८६४.९ म्हणजेचे सरासरीच्या ७७.४ टक्के पाऊस झाला आहे.पुणे,नाशिक,औरंगाबाद,अमरावती तसेच लातूर विभागात पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.त्यामुळे पुढील पिकांच्या उत्पादकतेत घट होण्याची शक्यता आहे.पिकांच्या पुढील वाढीसाठी पावसाची आवश्यकता आहे,असे कृषी अहवालात नमूद करण्यात आले आहे.कृषी विभागाच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हात २५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान पाऊस झाला आहे.तर नाशिक,नंदुरबार,जळगाव,अहमदनगर,कोल्हापूर,औरंगाबाद,जालना,बीड,लातूर,उत्स्मानाबाद,परभणी,बुलढाणा आणि चंद्रपूर या १३ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पावसाचे नोंद झाली आहे.केवळ ठाणे,रत्यागिरी व सातारा या तीनच जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून इतर १७ जिल्ह्यात ७५ ते १०० टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे यवतमाळ जिल्ह्यात ४६ हजार ६४९ हेक्टर क्षेत्र, चंद्रपूर जिल्ह्यात ११ हजार १६१ हेक्टर क्षेत्र,नांदेडमधील ७१ हजार ३४९ हेक्टर तर जळगावमधील २५४ हेक्टर,गडचिरोलीतील ९ हजार ६४२ हेक्टर ,नंदूरबारमधील ६१५ हेक्टर,धुळे ८५८ हेक्टर ,सातारा ३१८ हेक्टर व सांगली ४०९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.त्यात कापूस,सोयाबीन, तूर, भात,कांदा,ज्वारी,बाजरी, नाचणी, मुग, उडीद, भुईमुग,मका,वटाणा ,घेवडा,पावटा आदी पिकांचा समावेश आहे.त्याचप्रमाणे राज्यात सोलापूर जिल्ह्यात २९ हजार ५३९ हेक्टर ,अहमदनगर जिल्ह्यात ३४ हजार ७९८,पुणे २७ हजार ४२ हेक्टर, कोल्हापूर ९ हजार हेक्टर,सांगली ३ हजार ४०० हेक्टर व सातारा जिल्ह्यात ४ हजार ५०० हेक्टर असे एकूण १ लाख ८ हजार २७९ हेक्टर उसपिकाचे क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाले आहे...............पुणे विभाग पावसाचा खंड पुणे विभागात पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर प्रतिकुल परिणाम झाला असून त्यामुळे पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. विभागात सरासरीच्या तुलनेत एकूण ३९ तालुक्यांपैकी १३ तालुक्यात २५ ते ५० टक्के,१६ तालुक्यात ५० ते ७५ टक्के, ४ तालुक्यात ७५ ते १०० तर ६ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
राज्यात पावसाने दडी मारल्यानी पीक वाढीवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 6:34 PM
नैसर्गिक आपत्ती शाखेकडील अहवालानुसार राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण १ लाख ४१ हजार २५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख ८ हजार २७९ हेक्टर उसाचे क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाले आहे.
ठळक मुद्देकृषी विभागातर्फे पीक पेरणी व त्याच्या परिस्थितीचा २८ सप्टेंबरपर्यंतचा अहवाल प्रसिध्द पुणे विभागात पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर प्रतिकुल परिणाम पिकांच्या पुढील वाढीसाठी पावसाची आवश्यकता