शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका; धान्य, कांद्याची आवक घटली, मालवाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 6:49 AM

कांद्याचे २१ ट्रक व ५१ टेम्पो, बटाट्याचे ३४ ट्रक व १२ टेम्पो, लसणाचे ८ ट्रक व २ टेम्पोची आवक झाली. धान्य मार्केटमध्येही २५६ ट्रक, टेम्पोची आवक झाली.

नवी मुंबई : वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका शेतमालाला बसला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व मसाला मार्केटमध्ये आवक सुरळीत होती. परंतु, कांदा मार्केटमध्ये २५ टक्के आवक कमी झाली. धान्य वाहतुकीलाही फटका बसला. 

कांद्याचे २१ ट्रक व ५१ टेम्पो, बटाट्याचे ३४ ट्रक व १२ टेम्पो, लसणाचे ८ ट्रक व २ टेम्पोची आवक झाली. धान्य मार्केटमध्येही २५६ ट्रक, टेम्पोची आवक झाली.

मालवाहतूक ठप्पउरण : वाहनचालकांनी जेएनपीए परिसरातील कंटेनर वाहतूक रोखली. नंतर वाहने रस्त्याच्या कडेला लावून रस्ता खुला केल्याची माहिती न्हावा - शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांना दिली.  पण, चालकांनीच वाहने चालविण्यास नकार दिला. यामुळे पाचही बंदरातील कंटेनरची वाहतूक ठप्प झाली. आठ हजार कंटेनर ट्रेलर्सवर चालक नसल्याने वाहने उभी करून ठेवल्याची माहिती न्हावा -शेवा कंटेनर ओनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय पोतदार यांनी दिली. बंदरातून दररोज सुमारे २५ हजार कंटेनरची वाहतूक होते. बंदमुळे त्यांची चाके थांबल्याची माहिती महाराष्ट्र हेवी व्हेइकल ॲण्ड इंटरस्टेट कंटेनर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी दिली. 

विरोध नेमका कशामुळे ? -जुना कायदा काय म्हणतो?हिट अँड रन घटनांशी संबंधित विद्यमान कायद्याचा भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०४ अ अंतर्गत जो कोणी अविचारी किंवा निष्काळजी कृत्याद्वारे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल त्याला दोन वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या जातील.

नवीन कायद्यात काय तरतूद?- १०४ (१) : निष्काळजी कृत्याद्वारे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे सदोष मनुष्यवध नाही. दोषीला ५ वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड.- १०४ (२) : घटनास्थळावरून पळून गेला किंवा घटनेनंतर लगेच पोलिस अधिकारी किंवा दंडाधिकारी यांना घटनेची माहिती दिली नसेल तर १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड.

टॅंकरच्या बंदमुळे इंधन तुटवडा होणार? मनमाड (जि. नाशिक) :  संपात हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, इंडेन गॅस बॉटलिंग प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टँकर चालक सहभागी झाले. त्यामुळे राज्यात इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. संप कायम राहिल्यास पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. गोंदिया : वाहनचालकांनी टायर जाळून संताप व्यक्त केला. पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. आंदोलनात ट्रक, काळी-पिवळी, ऑटो व टँकरचालक सहभागी झाले.  

टॅग्स :agitationआंदोलनMarketबाजारGovernmentसरकारonionकांदा