राज्यात गेल्या आठवड्यात आलेल्या भीषण तौक्ते चक्रीवादळात (Cyclone Tauktae) कोकण किनारपट्टीसह अनेक भागांत मोठे नुकसान झाले. याची नुकसानभरपाई ही वाढीव दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर चंद्रपूरच्या दारुबंदीबाबत देखील महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Cabinate meeting descision on Cyclone Tauktae compensation, liquor ban in Chandrapur.)
मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी कोकणाचा दौरा केला होता. यामध्ये त्यांनी तौक्ते चक्रीवादळात झालेल्या हाणीची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच नुकसान भरपाई, मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई वाढीव दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चंद्रपूरमध्ये गेल्या काही वर्षांपासून दारुबंदी आहे. मात्र, याचा उलटा परिणाम दिसून आला आहे. दारुबंदीमुळे चंद्रपुरात अवैध दारुची विक्री आणि गुन्हेगारी फोफावली होती. हे रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.