शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सुधारणांची रेल अद्याप ‘नॅरोगेज’वर...

By admin | Published: February 24, 2015 11:30 PM

प्रवाशांच्या अपेक्षा : पुणे-सांगली-कोल्हापूर मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरणाची मागणी प्रलंबित

सांगली-सातारा- कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांना गुरुवारी सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात नवीन रेल्वेगाड्या व प्रवासी सुविधांची अपेक्षा आहे. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर मराठी रेल्वेमंत्री अर्थसंकल्प सादर करणार असल्याने प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुणे-सांगली-कोल्हापूर या मार्गाचे विद्युतीकरण, दुहेरीकरण करण्यासाठी आर्थिक तरतूद आवश्यक आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी गेल्या तीन वर्षांत एकही नवीन एस्क्प्रेस सुरू झालेली नाही. सुधारणांची रेल अजूनही ‘नॅरोगेज’च्या गतीनेच धावत आहे.गतवर्षी रेल्वे अर्थसंकल्पात पुणे-सांगली-कोल्हापूर या २२७ किमी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्वेक्षणाची घोषणा झाली आहे. दहा वर्षांपूर्वी करण्यात आलेले सर्वेक्षण बासनात गुंडाळून वारंवार दुहेरीकरणासाठी केवळ सर्वेक्षण करण्यात येत आहे. कोल्हापूर-मिरज-पुणे या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण झाल्यास रेल्वे प्रवास जलद होणार आहे. यापूर्वी लोंढा-मिरज-पुणे या मार्गाच्या विद्युतीकरणासाठी सर्वेक्षणाची घोषणा झाली; मात्र यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद झालेली नाही. कोल्हापूर ते वैभववाडी नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. मात्र नवीन रेल्वेमार्गाचे काम रेल्वेमंत्री सुरू करतील, अशी अपेक्षा आहे. पुणे-कोल्हापूर इंटर सिटी एक्स्प्रेस, कोल्हापूर-मिरज पॅसेंजर कऱ्हाडपर्यंत सोडण्याची मागणी प्रलंबित आहे. फलटण-बारामती या नवीन रखडलेल्या रेल्वेमार्गासाठी तरतूद व्हावी. कोल्हापूर व मिरज मॉडेल रेल्वेस्थानक बनविण्याची केवळ घोषणा ठरली आहे.मिरजेपर्यंत डबल लाईन करणे, रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी. जोधपूर, कोलकाता, आदी गाड्या कोल्हापुरातून सुरू व्हाव्यात, कोल्हापुरात पाच नव्या रेल्वे प्लॅटफॉर्मची निर्मिती करणे, निजामुद्दीन एक्स्प्रेसला कँटिन कार जोडणे, आदी प्रलंबित मागण्यांबाबत ठोस उपाययोजना होतील. कोकण रेल्वेचा सर्व्हे पूर्ण होऊनही अद्याप पुढील कामाबाबत कोणतीही हालचाल नाही. कोकण रेल्वेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा होईल,अशी अपेक्षा कोल्हापूरकरांना आहे. (प्रतिनिधी)उत्पन्न चांगले मिळत असूनदेखील कोल्हापूरला काही देताना मात्र, रेल्वे प्रशासन हात आखडता घेते. रेल्वे प्रशासन अर्थसंकल्पात गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरकडे दुर्लक्षच करत आहे. नवीन काही, तरी द्यावेच पण, त्याबरोबर प्रलंबित आणि वर्षानुवर्षे रखडलेल्या मागण्यांची पूर्तता करावी. - शिवनाथ बियाणी (सदस्य, रेल्वे सल्लागार समिती)..पाच वर्षांत कर्नाटकचा प्रभाव...रेल्वे मंत्री खर्गे, सदानंद गौडा, रेल्वे राज्यमंत्री मुनीअप्पा यांनी गेल्या पाच वर्षांत रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा न करता यशवंतपूर-दिल्ली संपर्कक्रांती एक्स्प्रेस,बेळगाव-मिरज पॅसेंजर, यशवंतपूर-चंदीगड एक्स्प्रेस, वास्को-चेन्नई एक्स्प्रेस, हुबळी-मिरज-कुर्ला एक्स्प्रेस, मिरज-यशवंतपूर एक्स्प्रेस या कर्नाटकातून अनेक नवीन रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी रेल्वे प्रशासनापुढे प्रभावहीन असल्याने सांगली, कोल्हापुरातून नवीन रेल्वेगाड्या सुरू होत नाहीत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून नवीन रेल्वेगाड्यांसह प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आहे.पश्चिम महाराष्ट्रासमिरज-कोल्हापूर, मिरज-पुणे, मिरज-बेळगाव या पॅसेंजर रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी असल्याने पॅसेंजरचे डबे वाढविण्याची मागणी आहे. यावर्षी रेल्वे अंदाजपत्रकात रेल्वेमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना काय देणार, याबाबत उत्सुकता आहे. मिरज जंक्शन स्थानक असतानाही कृषी मालाच्या वाहतुकीसाठी सुविधा अपुऱ्या आहेत. फुले, डाळिंब, द्राक्षांची दिल्लीला निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवासी रेल्वगाड्यात जागा मिळत नाही. हुबळी व बेंगलोरमधून बोगी भरून येत असल्याने येथील शेतकऱ्यांची अडचण होते. मिरजेतून कृषी मालाच्या निर्यातीसाठी व्यवस्था करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.जिल्ह्यात रेल्वेने सिमेंट, खते व इंधनाची आयात व साखर, धान्याची निर्यात होते. औद्योगिक उत्पादनांच्या मालवाहतुकीसाठी आवश्यक सुविधा व मालगाडी मिरजेतून उपलब्ध होत नसल्याने कर्नाटकात उगार येथून मालाची निर्यात करावी लागते. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेल्वे मालवाहतूक सुविधा उपलब्ध करण्याची मागणी आहे. प्रतिवर्षी रेल्वे अंदाजपत्रक पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी निराशाजनक ठरते. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांच्या मागण्यांकडे नेहमीच रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येते; मात्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांच्या मागण्यांना न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ‘सर्व्हे’च्या पुढे गाडी हलावी...कोल्हापूर-राजापूर, कोल्हापूर-वैभववाडी, कोल्हापूर-रत्नागिरी, कऱ्हाड-चिपळूण, कऱ्हाड-धारवाड या पाच मार्गांचा सर्व्हे झाला. मात्र, याबद्दल रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधी गप्प आहेत. सर्व्हेनंतर या मार्गांवरील रेल्वे सुरू करण्याचा निर्णय व्हावा, अशी मागणी आहे.अशा आहेतअपेक्षामहालक्ष्मी, सह्याद्री एक्स्प्रेस यांसारख्या गाड्यांचा वेग वाढवावा.कोल्हापूर-पुणे मार्गाचे दुहेरीकरण व्हावे. कोल्हापूर-सोलापूर रेल्वे सकाळी नऊ वाजता सुरू करावी.नव्या मार्गांवरील रेल्वे सुरू व्हाव्यात.कोल्हापूर, सातारा, सांगली, मिरज जंक्शनचा विकास व्हावा.कोल्हापूर-मिरज-सांगली-सातारा मार्गावर शटल (लोकल) सर्व्हिस सुरू करावी. कोल्हापूर-अहमदाबाद आठवड्यातून दोनवेळा सुरू व्हावी.प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात.