शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

"त्यांच्या थोबाडीत मारायला हवी होती"; नितेश राणेंच्या विधानावर इम्तियाज जलील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 6:00 PM

आमदार नितेश राणे यांनी सांगलीत बोलताना महाराष्ट्र पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.

Imtiyaz Jaleel on Nitesh Rane : भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा सांगलीत बोलताना महाराष्ट्र पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. पोलिसांनो अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, अशी उघड धमकी दिल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. विविध स्तरातून नितेश राणे यांच्याविषयी निषेध व्यक्त केला जात आहे. 'एमआयएम'चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही नितेश राणेंवर जोरदार टीका केली आहे. नितेश राणेंना महत्त्व देऊ नका असं म्हणत जलील यांनी या विधानाबाबत भाष्य केलं आहे.

नितेश राणे हे मंगळवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चात बोलत होते. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो, असेही नितेश राणे म्हणाले होते. त्यावर आता एमआयएमचे इम्तियाज जलील नितेश राणेंवर टीका केलीय. 

काय म्हणाले नितेश राणे?

पोलीस विभागीतील काही पोलीस अधिकारी हिंदू समाजाच्या लव्ह जिहादाचा विषय आल्यास लवकर केस दाखल करत नाहीत. मुलीच्या पालकांबरोबर गैरव्यवहार करतात. अशा पोलिसांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव खराब होतं. अशा सडक्या आंब्यांना त्या पद्धतीचा इशारा देतो. राज्यात हिंदुत्ववादी सरकार असून हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका. हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू दिसले तर अशा जिल्ह्यात बदली करु, बायकोचाही फोन लागणार नाही, असा इशारा नितेश राणेंनी दिला. 

"आपण नितेश राणेंना खूप महत्त्व देतोय. महाराष्ट्रात भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे जाती जातींचे विभाजन पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने तिथे  चांगला पोलीस अधिकारी असला असता तर त्याने त्यांच्या थोबाडीत मारायला पाहिजे होती. तुम्ही अशा प्रकारे द्वेष निर्माण करण्याचे काम करताय आणि मग महाराष्ट्र पोलिसांचे हात बांधलेले आहेत का?," असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला.

नितेश राणे वक्तव्यावर ठाम "मी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांबद्दल बोललो नाही. मात्र, काही पोलीस अधिकारी लव जिहाद व लँड जिहादवाल्यांना मदत करतात. पोलीस विभागातील काही अधिकारी हिंदू समाजातील लव्ह जिहादचे विषय आल्यास १० ते १५ दिवस केस दाखल करत नाही. काही पोलीस अधिकाऱ्यामुळे पोलीस विभाग बदनाम होतो आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव खराब होत आहे. पीडित मुलींच्या आईवडिलांचे ऐकून घेणार नसेल, न्याय मिळवून देण्यापेक्षा पीडितांची चौकशी करणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका घेणे माझे कर्तव्य आहे. विरोधकांच्या इशाऱ्यावर जे अधिकारी काम करणार असेल तर अशा अधिकाऱ्यांनी आपली वर्दी वाचवून दाखवावी," असे स्पष्टीकरण नितेश राणे यांनी दिलं. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Imtiaz Jalilइम्तियाज जलीलSangliसांगलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस