शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा ‘महिला’वार, अनेक महिला उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 7:27 AM

Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्याच्या राजकारणात गुरुवार हा ‘महिला’वार ठरला.

 मुंबई - राज्याच्या राजकारणात गुरुवार हा ‘महिला’वार ठरला. सर्वोच्च न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरविल्यानंतर काही तासांतच त्यांनी जल्लोषात उमेदवारी अर्ज भरला. नांदेड-हिंगोलीमार्गे येऊन राजश्री पाटील यांनी यवतमाळ-वाशिममध्ये शिंदेसेनेकडून अर्ज भरला. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना यांनी अजित पवार गटात प्रवेश केला, आता त्या तिथे उमेदवार असतील. बीडमध्ये तिकिटाचा विश्वास असलेल्या ज्योती मेटे यांची मात्र निराशा झाली.

अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. राजश्री पाटील यवतमाळमधील आपल्या माहेरघरी गेल्या तेव्हा आईवडिलांच्या आठवणीने त्यांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. उमेदवारी नाकारण्यात आलेल्या  यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी या राजश्री पाटील यांचा अर्ज भरताना हजर नव्हत्या, हा राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरला. अमरावती मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर केली होती. 

मात्र, गुरुवारी शेवटच्या दिवशी त्यांनी अर्जच भरला नाही. वंचितने त्या ठिकाणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला. आनंदराज यांनी रिपब्लिकन सेनेतर्फे अर्ज भरला. ते रिंगणात कायम राहतात का, याबाबत उत्सुकता आहे. 

 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४