- अजित मांडकेठाणे - आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाध यात्रेच्या आधी शिंदे गटाचा उध्दव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. सोमवारी नाशिक जिल्ह्यातील अनेक जेष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवक, पदाधिकारी असा ५० हून अधिक जणांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यात आनंद दिघे यांचे जुने सहकारी देखील यात सहभागी असून या सर्वानी जिल्ह्यातील उध्दव ठाकरे गटाच्या कारभाराला कंटाळून प्रवेश केल्याचे सांगितले. नाशिक बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरास्ते यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला.
बाळासाहेब शिवसेना पक्षात मागील काही महिन्यात उध्दव ठाकरे गटातील शिवसैनिक प्रवेश करीत आहेत, आजही हा ओघ वाढतांना दिसत आहे. त्यानुसार सोमवारी देखील नाशिक ग्रामीणमधील ५०हून अधिक पदाधिका:यांनी प्रवेश केला. यात जेष्ठ शिवसैनिक शिवाजी पालकर (माजी महानगर प्रमुख, राजेंद्र घुले, गणोश शेलार, रामभाऊ तांबे, प्रशांत जाधव, मंगेश दिघे, मयुर जोशी, निलेश शेवाळे आदींसह इतर महत्वाच्या पदाधिका:यांचा यात समावेश आहे.
मोठय़ा प्रमाणावर आज ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम केले होते, त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला अधिक बळ मिळेल.- एकनाथ शिंदे, (मुख्यमंत्री, महाराष्ट्र, राज्य)नाशिकमध्ये जो डोलारा उभा झाला, हे सर्व त्या देवाळाचे दगड आहेत, त्यांच्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना उभी राहिली. आदीत्य ठाकरे यांना हा मोठा धक्का दिला आहे. घराणोशाहीच्या विरोधात हा प्रवेश केला आहे. हिंदुत्वाला पाठींबा देण्यासाठी हा प्रवेश या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.- नरेश म्हस्के ( प्रवक्ते, बाळासाहेबांची शिवसेना)