शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 6:41 AM

रखडलेल्या पेसा भरतीसाेबतच धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देऊ नये या मागण्यांसाठी आदिवासी लाेकप्रतिनिधी आक्रमक झाले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आदिवासींच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मिळत नसल्याने राज्यातील आदिवासी आमदारांनी शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत मंत्रालयात प्रचंड गोंधळ घातला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह काही आमदारांनी थेट मंत्रालयातील जाळीवर उड्या घेत संताप व्यक्त केला. अनेक तासांच्या या गदारोळानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत पेसा भरती करण्याचे आश्वासन मिळाले.

रखडलेल्या पेसा भरतीसाेबतच धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देऊ नये या मागण्यांसाठी आदिवासी लाेकप्रतिनिधी आक्रमक झाले. 

आमदारांच्या उड्या अन्‌ सामान्यांना पडलेले प्रश्नnमंत्रालयातील जाळीवर उडी मारणाऱ्या सर्वसामान्यांवर पोलिस गुन्हा दाखल करतात. या आमदारांच्या विरोधात गुन्हा का नोंदविला नाही?nआंदोलक आमदारांना बोलावून लगेच आश्वासन देणारे राज्य सरकार सामान्यांनाही असाच न्याय देणार का?nसत्तेत असताना आदिवासींचे प्रश्न सोडविता का आले नाही?nनिवडणुकीसाठी ही स्टंटबाजी कितपत योग्य आहे?nविधानसभा उपाध्यक्ष पदावरील व्यक्तीने असे आंदोलन करावे का?

मुख्यमंत्र्यांनी दिले भरतीचे आश्वासनपरीक्षा उत्तीर्ण झालेत पण नियुक्ती नाही, अशी पेसा अंतर्गत असलेली ९ हजार पदे भरण्यास मान्यता दिली जाईल. तसेच, न्यायालयाचा निकाल पेसा भरतीच्या विरोधात गेला, तर अधिसंख्य पदे निर्माण करून आदिवासी तरुणांची भरती केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदिवासी आमदारांंबरोबर नंतर झालेल्या बैठकीत दिले.

जाळीवर कोणी उड्या मारल्या?nविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ. nकाँग्रेसचे हिरामण खोसकर. nबहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील.

टॅग्स :MLAआमदार