शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आगामी निवडणुकीत 'तोच' फॉर्म्युला कायम राहील, त्यात...; शिवसेनेचा BJP ला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 2:14 PM

महाविकास आघाडीसोबत विशेषत: उद्धव ठाकरेंचे राष्ट्रवादीसोबत जाणे हे आम्हाला शिवसेनेच्या प्रवासासाठी घातक वाटले असा आरोप खासदार गजानन किर्तीकर यांनी केला.

नवी दिल्ली - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यात शिंदे-ठाकरे संघर्ष पाहायला मिळाला. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची पक्षबांधणी सुरू झाली. मात्र तोच शिंदे गटाला केवळ ४८-५० जागा निवडणुकीत दिल्या जातील असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्यावरून आता नुकतेच संसदीय नेतेपदी निवड झालेल्या खासदार गजानन किर्तीकरांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. 

खासदार गजानन किर्तीकर म्हणाले की, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा २०१९ ला एकत्र लढली. महाराष्ट्रात १२६ शिवसेना आणि १६२ जागा भाजपा लढली. त्यातील भाजपाचे १०२ तर आमचे ५६ आले. लोकसभेलाही ४८ पैकी २२-२६ फॉर्म्युला होता. हाच फॉर्म्युला तसाच राहिला पाहिजे. काही जागांवर चर्चा होईल. परंतु आकडा बदलणार नाही. ही शिवसेना इतकी कमजोर नाही हे लक्षात ठेवावे असं त्यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराजबाळासाहेबांची शिवसेना आमच्या मनात कोरली आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीचा आम्हाला त्रास होत होता. बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतली जात होती. आम्ही वारंवार सांगत होतो पण बदल होत नव्हता. काही ठराविक लोकांनी त्यांना घेरले होते. त्यापद्धतीची कार्यपद्धती सुरू होती. आम्ही बाळासाहेबांसोबत काम केले आहे. अमोल आदित्य ठाकरेंसोबत काम करतोय त्यामुळे त्याला काही माहिती नाही. मी इतकी वर्ष शिवसेनेत स्थापन झाल्यापासून काम करतोय. संघटना बांधणीसाठी काम करतोय हा अनुभव घेतल्यानंतर शिवसेना आमच्या मनातील पुसट होत चालली होती. महाविकास आघाडीसोबत विशेषत: उद्धव ठाकरेंचे राष्ट्रवादीसोबत जाणे हे आम्हाला शिवसेनेच्या प्रवासासाठी घातक वाटले. या सर्व गोष्टीचा आम्हाला त्रास होत होता म्हणून आम्ही हा उठाव केला असं गजानन किर्तीकरांनी म्हटलं. 

शिवसेनेचा व्हिप 'त्यांना' लागू होत नाहीशिवसेना जो पक्ष आहे ज्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. आता हा पक्ष NDA चा घटक पक्ष व्हावा यासाठी संजय राऊतांना काढावे लागले. त्यांच्याजागी माझी नेमणूक करावी लागली. हा तांत्रिक मुद्दा आहे. लोकसभेत १३ खासदार स्वखुशीने सभापतींना पत्र देऊन शिवसेनेत आले. राज्यात सत्तासंघर्ष झाला. व्हिप लागू होत नाही हे माझे मत आहे. परंतु विधिज्ञ जास्त अनुभवाने सांगतील असंही किर्तीकरांनी सांगितले आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाGajanan Kirtikarगजानन कीर्तीकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा