शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

साथीचे आजार रोखण्यास यंत्रणा अपुरी

By admin | Published: May 17, 2016 1:43 AM

चिकुनगुनिया व डेंगीसारख्या डासांपासून प्रसार होणाऱ्या साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी महापालिकेने तितिकीशी प्रभावी व पुरेशी यंत्रणा राबवलेली नाही

येरवडा : पुणे हे राज्यातील अतिशय महत्त्वाचे शहर आहे, मात्र चिकुनगुनिया व डेंगीसारख्या डासांपासून प्रसार होणाऱ्या साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी महापालिकेने तितिकीशी प्रभावी व पुरेशी यंत्रणा राबवलेली नाही. पुण्याच्या तुलनेत मुंबई, सोलापूर व पिंंपरी-चिंचवडसारख्या शहरांसह राज्याच्या ग्रामीण भागामध्येही अशा रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना होत असल्या तरी शहरात रोगनियंत्रणासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षण व त्यानंतरच्या उपाययोजनांसाठी आवश्यक कर्मचारी (आॅन फिल्ड स्टाफ) पुणे महापालिकेकडे कमी प्रमाणात आहे, त्यामुळेच कदाचित शहरात चिकुनगुनिया व डेंगीच्या रुग्णांचे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत जास्त असल्याचे मत राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने यावर्षीपासून १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंगी दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात राज्यभर करण्यात आलेल्या उपाययोजना व उपक्रमांची माहिती देण्यासाठी विश्रांतवाडीजवळील आरोग्य विभागाच्या उपसंचालनालयामध्ये (परिवर्तन) आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. जगताप यांनी ही माहिती दिली. या वेळी सहायक संचालक डॉ. बाळकृष्ण कांबळे, डॉ. हेमंत जोशी, भावना चौधरी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, कीटकशास्त्रज्ञ बी. आर. माने उपस्थित होते. पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. सोमनाथ परदेशींना आपण अनेक वेळा पत्रे पाठवून सूचना केल्या आहेत. तसेच आपल्या विभागाचे अधिकारी त्यांना भेटले आहेत, मात्र परदेशी त्यांची जबाबदारी कनिष्ठांवर ढकलतात, तसेच त्यांच्या कनिष्ठांकडूनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप डॉ. जगताप यांनी केला. (वार्ताहर)।झिकाचा रुग्ण आपल्याकडे नाहीउत्तर अमेरिकेसारख्या थंड हवामान असलेल्या देशामध्ये आढळलेला झिका विषाणूचा रुग्ण अद्याप आपल्याकडे तरी दिसून आलेला नाही. त्यामुळे या विषाणूचा आपल्याकडे अजिबात प्रसार झालेला नाही. तरीही परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळ प्राधिकरण व राज्याच्या आरोग्य विभागाकडून तपासणी करण्याची खबरदारी घेतली जात असल्याचे कांचन जगताप यांनी सांगितले.शहरी भागात जास्त रुग्ण चिकुनगुनिया व डेंगीचे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक रुग्ण आढळतात. यावर्षी जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांत राज्यात डेंगीचे ५६४ रुग्ण आढळले आहेत, तर यामध्ये एकाचाही मृत्यू झालेला नाही. याच कालावधीत केरळमध्ये ९७९, तामिळनाडूत ८९४, कर्नाटकमध्ये ८६४ तर गुजरातमध्ये डेंगीचे ३३७ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ५६४ रुग्णांपैकी ग्रामीण भागातील २६९ तर शहरी भागातील ३९५ रुग्ण आहेत. सन २०१४ मध्ये राज्यात डेंगीचा उद्रेक झाला होता. त्यावर्षी राज्यात ८५७३ रुग्णांना डेंगी झाला तर यामध्ये १४४ जण दगावले होते. त्यानंतर केलेल्या उपाययोजनांमुळे सन २०१५ मध्ये डेंगीच्या रुग्णांचा आकडा ५११९ वर आला तर त्यावर्षी ३३ जण यामुळे दगावले होते.