शहरं
Join us  
Trending Stories
1
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
2
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
3
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
4
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
5
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
6
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
7
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
8
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
9
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
10
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
11
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
12
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
13
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
14
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
15
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
16
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
17
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
19
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
20
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली

औरंगाबादेत आयकर विभागाचे छापे

By admin | Published: March 18, 2015 1:39 AM

शहरातील १२ ज्वेलर्स व १० बिल्डर्सच्या कार्यालयांवर मंगळवारी आयकर विभागाने छापे टाकले़ दुपारी सुरू झालेली तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.

औरंगाबाद : शहरातील १२ ज्वेलर्स व १० बिल्डर्सच्या कार्यालयांवर मंगळवारी आयकर विभागाने छापे टाकले़ दुपारी सुरू झालेली तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. यामुळे शहरात पुन्हा एकदा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. आयकर विभागाच्या विविध पथकांनी मंगळवारी दुपारी एकाच वेळी शहरात बिल्डरांची कार्यालये व ज्वेलर्सच्या शोरूममध्ये तपासणी सुरूकेली. कासारी बाजार, सराफा बाजार, जवाहर कॉलनी येथील १२ ज्वेलर्स शोरूमचे शटर दुपारपासून अर्धवट बंद करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी आयकर विभागाचे चार अधिकारी स्टॉक, कागदपत्रांची तपासणी करीत होते. त्याचवेळी काही बिल्डर्सच्या कार्यालयातही आयकर अधिकारी तपासणी करीत होते. सुमारे १३० ते १५० अधिकारी तपासणीच्या कामात गुंतले होते. या तपासणीची माहिती सायंकाळपर्यंत शहरातील व्यावसायिकांमध्ये पसरली. व्हॉटस् अ‍ॅपवर ही माहिती पाठविली जात होती. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती. यासंदर्भात काही ज्वेलर्सनी सांगितले की, आमच्या शोरूममध्ये दुपारी अचानक आयकर विभागाचे अधिकारी आले. त्यांनी आपली ओळख दाखवून सर्वप्रथम शोरूमचे शटर अर्धवट खाली करण्यास सांगितले. यानंतर शोरूममधील सोने- चांदी दागिन्यांच्या नोंदी व खरेदी बिले याची तपासणी सुरू केली. यानंतर बिले, मालाची आवक-जावक रजिस्टर, विक्री रजिस्टर, आयकरशी संबंधित कागदपत्रे तपासली जात होती. सदर प्रतिनिधीने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण संवाद होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)कारवाईचा इशारा आयकर विभागाने २४ फेब्रुवारी रोजी शहरातील ८ प्रतिष्ठानांच्या कागदपत्रांची तपासणी केली होती. यात इलेक्ट्रॉनिक्स, सॉ मिल, हार्डवेअर, आॅप्टिकल्स, खाजगी क्लासेस यांची एकाचवेळी तपासणी केली होती. त्यावेळी अतिरिक्त आयकर आयुक्त बी.पी.सिंग यांनी इशारा दिला होता की, ज्यांनी आयकर विवरण दाखल केले नाही, अशांची यादी तयार करून आम्ही त्यांच्यावर कारवाई करीत आहोत. तसेच तपासणीमध्ये आयकर बुडवल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते. विभागाने २१ दिवसांनंतर मंगळवारी पुन्हा नवीन २२ ठिकाणी कारवाई केली.