शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

कळंब येथे रुग्णांची गैरसोय

By admin | Published: May 21, 2016 3:14 AM

वैद्यकीय अधिकारी दोन महिन्यांच्या रजेवर असल्याने व त्यांच्या जागी नेमणूक करण्यात आलेले प्रभारी अधिकारी देखील रजेवर असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे

नेरळ : कर्जत तालुक्यातील कळंब येथील आदिवासीबहुल प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी दोन महिन्यांच्या रजेवर असल्याने व त्यांच्या जागी नेमणूक करण्यात आलेले प्रभारी अधिकारी देखील रजेवर असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. गेले अनेक दिवस हे रुग्णालय डॉक्टरांविनाच सुरू असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत असून जादा पैसे खर्च करावे लागत आहेत.नेरळ- कळंब रस्त्यालगत कळंब गावाजवळ हे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. कळंब परिसरातील अनेक ग्रामीण भागातील आदिवासी रुग्ण कमी खर्चात उपचार होतील या आशेने येथे येत असतात. परंतु या रु ग्णालयात आल्यानंतर रुग्णांची निराशा होत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रावर मागील वर्षी लाखो रु पये खर्च करून रु ग्णालयाची इमारत सुबक केली असली तरी सुविधांचा मात्र पत्ता नाही. हे रुग्णालय असुविधांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. या रुग्णालयात गोळ्या, औषधांची कमतरता अशा अनेक समस्या आहेत. एक वैद्यकीय अधिकारी रजेवर असताना दुसरा अधिकारी रजेवर जाणे कितपत योग्य आहे असा प्रश्न येथे येणाऱ्या रु ग्णांनकडून उपस्थित के ला जातआहे.मंगळवारी सकाळी ११ वाजता शिवसेना नेते भरत भगत, कळंब शिवसेना शाखाप्रमुख जनार्दन बदे, नरेश बदे, आसलम पानसरे, मुनिर सयरे, धनेश राणे, विशाल तुपे, समीर तरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली असता तेथे एकही डॉक्टर हजर नसल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करून त्यांच्याशी चर्चा केली व त्यांनी लगेचच रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत १७ महसुली गावे व २७ आदिवासी वाड्या असून पोशीर, पाषाणे, कळंब, खांडस, वारे अशी पाच उपकेंद्रे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येतात. परंतु याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे यावरून दिसते. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी आल्यानंतर येथील डॉक्टर औषधे संपली आहेत, ती बाहेरून आणावी लागतील असा सल्ला देतात. मग हे रु ग्णालय सरकारी आहे की, एखादा खासगी दवाखाना असा प्रश्न ग्रामीण व आदिवासी भागातून येणाऱ्या रु ग्णांना पडतो.वैद्यकीय अधिकारी कर्तव्याचे पालन करत नाहीत अशी तक्र ार नागरिक करत आहेत.(वार्ताहर)कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पावरा हे दोन महिन्यांसाठी रजेवर आहेत. त्यांच्याजागी कडाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश कोकरे यांची नियुक्ती के लीहोती. तेही अचानक दोन दिवस न आल्याने त्यांच्या जागेवर डॉ. दिनेश जोशी यांना जाण्यास सांगितले होते. परंतु ते हजर झाले नाहीत. रु ग्णांची गैरसोय होणार नाही अशी व्यवस्था केली जाईल.- डॉ. सी. के. मोरे, तालुका आरोग्य अधिकारी, कर्जतसध्या उन्हामुळे सर्वत्र पाण्याचे स्रोत कमी होत आहेत. जे शिल्लक पाणी आहे ते दूषित आहे. यामुळे साथीचे आजार पसरु शकतात. या आजारांना आवरण्यासाठी हे रु ग्णालय सज्ज असायला हवे. परंतु येथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने रु ग्णालयाची रुग्णसेवा रामभरोसे आहे. त्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली तर जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.-भरत भगत, शिवसेना माजी तालुकाप्रमुख।१७ महसुली गावेया प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत १७ महसुली गावे व २७ आदिवासी वाड्या असून पोशीर, पाषाणे, कळंब, खांडस, वारे अशी पाच उपकेंद्रे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येतात. परंतु याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे यावरून दिसते. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी आल्यानंतर येथील डॉक्टर औषधे संपली आहेत, ती बाहेरून आणावी लागतील असा सल्ला देतात.