शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील अपघातात वाढ

By admin | Published: January 17, 2017 3:27 AM

कर्जत-कल्याण राज्य मार्गावर गेल्या दोन महिन्यांत पाच अपघात घडले आहेत.

नेरळ : कर्जत-कल्याण राज्य मार्गावर गेल्या दोन महिन्यांत पाच अपघात घडले आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे हे अपघात होत असून ही बाब बांधकाम विभागाच्या अनेकदा निदर्शनास आणून दिली आहे. मात्र तरीही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. कर्जत तालुक्यातील कर्जत -कल्याण राज्य मार्गावरील डिकसळजवळील एका हॉटेलजवळ गतिरोधक आणि आणि पुढे लगेच खड्डा असल्याने याठिकाणी वारंवार अपघात होतात. दोन महिन्यांत दोन चारचाकी आणि दोन दुचाकीला येथे अपघात घडला असून अनेक जण जखमी झाले आहेत. कर्जत तालुक्यात अनेक रस्त्यांची खड्ड्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सर्वच रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी प्रवासी व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. रस्ते भरण्याचे काम काही ठिकाणी करण्यात आले असले तरी तेही निकृष्ट दर्जाचे असल्याने आठवडाभरातच रस्ते ‘जैसे थे’ च होते. परंतु लाखो रु पये खर्च करून ठेकेदार खड्डे कशा प्रकारे भरतात याची पाहणी अधिकारीकरीत नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने खड्डे भरण्याचे काम करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. कर्जत - कल्याण मार्गावरही अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पहायला मिळत आहेत. हे खड्डे आतापर्यंत चार वेळा भरण्यात आले आहे. मात्र अजूनही त्यांची दुरवस्थाच आहे. याच रस्त्यावर नेरळ जिते गावाजवळ पावसाळ्यात दरड कोसळून काही भाग रस्त्यावर आला होता. ही दरड अद्याप उचललेली नाही. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे हाल होत आहेत. लवकरात लवकर डिकसळ येथील अपघात ठिकाणाची पाहणी करून त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. या संदर्भात बांधकाम विभागाचे उप अभियंता चंद्रशेखर सहनाल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील डिकसळ येथील हॉटेलजवळ गेल्या दोन महिन्यांत पाच अपघात घडले असून अनेक जण जखमी झाले आहेत. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता चंद्रशेखर सहनाल यांच्याशी अनेक वेळा संपर्क करून अपघातासंदर्भात कळविले आहे. परंतु त्यांनी अद्यापही या जागेची पाहणी केली नाही. त्यांनी या अपघात ठिकाणी काहीही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने येथे अपघाताची मालिका सुरूच आहे.- किशोर गायकवाड, स्थानिक ग्रामस्थ,डिकसळ