पुणे : शिक्षण हक्क कायद्यााअंतर्गत (आरटीई) वंचित व दुर्बल घटकांतील २५ मोफत प्रवेशासाठी वयाची कमाल मर्यादा ७ वर्षे २ महिने २९ दिवस करण्यात आली आहे. आरटीईअंतर्गत इयत्ता पहिलीसाठी शाळांकडून प्रवेश दिले जातात. या प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत २२ मार्च रोजी संपणार होती, त्याला आता ३० मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यभरातील अनुदानित, विनाअनुदानित इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा शिशू गटातील २५ टक्के प्रवेश मोफत देणे बंधनकारक आहे. या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ मार्च पासून सुरू झालेली आहे. या प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी आतापर्यंत बालकाचे वय मर्यादा किमान ६ वर्ष व कमाल वय ६ वर्ष ११ महिने २९ दिवस होते. यामध्ये वाढ करण्याची मागणी पालकांकडून केली जात होती. त्यानुसार आता पहिलीतील प्रवेशासाठी बालकाची कमाल वय ७ वर्ष २ महिने २९ दिवस करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.राज्यभरातील ९ हजार १९४ शाळांमधील १ लाख १६ हजार ७७५ जागांसाठी आतापर्यंत २ लाख १३ हजार ८६२ अर्ज आले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्हयातून सर्वाधिक ४८ हजार ११५ अर्ज आले आहेत. पुणे जिल्हयात प्रवेशासाठी १६ हजार ५९४ जागा उपलब्ध आहेत. पालकाला प्रवेश नोंदणी करताना १ किमी, ३ किमी व त्यापेक्षा अधिक अंतरातील फक्त १० शाळा निवडता येतील. परंतु प्रत्यक्ष एकच शाळेला प्रवेश मिळणार आहे. सदर कालावधीमध्ये पालकाने आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित करायचे आहे. अन्यथा पुढच्या फेरीत त्या पाल्याचा विचार केला जाणार नाही. कोणत्याही सबळ कारणाअभावी शाळेला प्रवेश नाकारता येणार नाही.
आरटीई प्रवेशाच्या वयोमर्यादेमध्ये वाढ ; पालकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 6:48 PM
राज्यभरातील अनुदानित, विनाअनुदानित इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा शिशू गटातील २५ टक्के प्रवेश मोफत देणे बंधनकारक आहे...
ठळक मुद्देअर्ज भरण्यास ३० मार्च पर्यंत मुदतवाढ या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ मार्च पासून सुरू पुणे जिल्हयात प्रवेशासाठी १६ हजार ५९४ जागा उपलब्ध