ठाणे : परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मीरा रोडच्या कॉल सेंटरचा संचालक जगदीश कनानी याच्यासह चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कनानीला सात, तर उर्वरित तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.मुंबईतून १६ आॅक्टोबर रोजी अटक करण्यात आलेला कनानी याला सुरुवातीला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. कनानी याने बोरिवली आणि मालाड भागात कॉल सेंटर सुरू केले होते. कॉल सेंटर घोटाळ्यातील अनेक म्होरक्यांपैकीच तो एक असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे त्याच्याकडून या घोटाळ्यासंदर्भात आणखी माहिती मिळू शकते, असे सांगत पोलिसांनी त्याची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. त्यानुसार त्याला न्यायालयाने २६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. सुफिया मझुवर्की (२६), अर्जुन वासुदेव (२४) आणि नासीर घोरी (२८) या तिघांना २४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस मिळाली आहे. या प्रकरणात फरार झालेला महंमदअली मझुवर्की हा सुफियाचा भाऊ आहे. (प्रतिनिधी)
कॉल सेंटर प्रकरणातील चौघांच्या कोठडीत वाढ
By admin | Published: October 21, 2016 1:42 AM