सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिलतील 192 गावे इको-सेन्सिटिव्हमुक्त अद्यापही झालेली नाहीत़ असे असतानाही विरोधक इको-सेन्सिटिव्ह रद्द झाले आणि ते आम्हीच केले, अशा बढाया मारत आहेत. हे त्यांचे अज्ञान असून, विरोधकांनी आधी या गोष्टींचा पूर्ण अभ्यास करावा व नंतरच बोलावे. आपले अज्ञान नको तेथे पाजळू नये, अशी टीका पालकमंत्री नारायण राणो यांनी शुक्रवारी केली.
सिंधुदुर्गातील विकासकामांबाबत पालकमंत्री नारायण राणो यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली़ बैठकीनंतर राणो पत्रकारांशी बोलत होते. राणो म्हणाले, सिंधुदुर्ग जिलतील अधिस्थगन हे सहा तालुक्यांमध्ये लागू होते. याची मुदत 25 जुलै होती.
मात्र, 25 जुलैच्या केंद्र सरकारच्या पत्रनुसार अधिस्थगनची मुदत वाढली नसल्याने जिलंतील सहाही तालुक्यांमधील अधिस्थगन उठले आहे. मात्र, त्या 192 गावांमधील तसेच सावंतवाडी, दोडामार्गमधील 26 गावांतील अधिस्थगन अद्यापही उठलेले नाही. यासाठी पंतप्रधानांना आपण पत्र लिहिल्याचेही ते म्हणाले.
च्तथापि, पश्चिम घाट संवर्धनाच्या उपयुक्ततेचा तपास करणा:या के. कस्तुरीरंगन समितीने इकोसेन्सेटिव्ह म्हणून यादीत टाकलेली 112 गावे या क्षेत्रतून कोणत्याही स्थितीत वगळण्यात येणार नाहीत, हेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही आधाराशिवाय बंदी घातलेली गावे आपण वगळली आहेत, असे सांगून ते म्हणाले, या निर्णयामुळे कोकणातील विकासकामांना चालना मिळेल.
च्राजकीय व पर्यावणविषयक संवेदनशील असणा:या या विषयावर केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रलयाने शुक्रवारी शिक्कामोर्तब का केले, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी दिले.
पराभव झटकून कामाला लागा
लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत आत्मचिंतन करा. पराभव झटकून कामाला लागा, असे आदेश राणो यांनी शुक्रवारी कणकवलीत झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना दिले. तसेच ज्या पदाधिका:यांना काम करायचे नसेल, त्यांच्याशी जिल्हाध्यक्षांनी बोलून त्यांच्या पदांचे राजीनामे घ्यावेत, अशा शब्दांत पदाधिका:यांना कानपिचक्याही यावेळी त्यांनी दिल्या. केंद्र सरकारच्या ‘अच्छे दिना’च्या घोषणोप्रमाणो ‘अच्छे दिन’ केवळ त्यांचेच आले आहेत. जनतेचे मात्र, ‘बुरे दिन’ आले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेस प्रांतिक सदस्य नीतेश राणो, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, प्रवीण भोसले आदी उपस्थित होते.