नितीन गव्हाळे/ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 21 - मुलगी जन्माला घालणे म्हणजे, हुंड्याची तजवीज करावी लागणार. तिच्या रक्षणाचीही जबाबदारी आली, ही पुरुषप्रधान मानसिकता. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. मुलगी हे काय तर परक्याचंधन. या गैरसमजुतीतून आणि मुलाच्या हव्याशापोटी मुलीला गर्भातच मारण्याची मानसिकता होती. परंतु आता ही मानसिकता बदलत आहे. नकोशी झालेली मुलगी आता आपलीशी वाटायला लागली आहे. अकोला शहरात मुलींच्या जन्मदरात समाधानकारक वाढ झाली असून, मुलींच्या जन्मदरात वाढ झालेले अकोला हे राज्यातील पहिलं शहर ठरलं आहे. राष्ट्रीय कुटुंबकल्याण विभागाने २0१५ व १६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये अकोला शहरात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या १0६८ इतकी झाली आहे. हा एक अकोलेकरांसाठी शुभसंकेत आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून सातत्याने ह्यबेटी बचावह्ण अभियान राबविले जात आहे. यासोबतच शासनाने ह्यपीसीपीएनडीटीह्ण कायद्यात कडक तरतुदी करून सोनोग्राफी करण्यावर पूर्णत: बंदी घातली आहे. तसेच शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संघटनांच्या मदतीने सातत्याने मुलगी वाचवा, भ्रूणहत्या करून नका. तिला जगू द्या... जगणे तिचा अधिकार आहे, अशी जनजागृती केली. त्याचा परिणाम जनमानसावर दिसून आला. मुलाला वंशाचा दिवा समजून त्याच्या जन्मासाठी प्रयत्न करणारे आता मुलीच्या जन्माचे स्वागत करू लागले आहेत. पाच वर्षांपूर्वी अकोल्यात मुलींची संख्या हजार मुलांमागे ८३0 एवढी होती. परंतु आता समाजाला मुलगा-मुलगी एकसमान... असल्याचे महत्त्व पटू लागले आहे. समाजाने आता ह्यनकोशीह्णला स्वीकारण्याची तयारी दाखविली आहे. अकोलेकरांनी सत्कारात्मक बदल घडवून आणत राज्यामध्ये एक चांगला संदेश दिला आहे. हजार मुलांमागे थोडी थोडकी नव्हेतर १0६८ इतकी मुलींची संख्या आहे. मुलींमध्ये सिंधू, साक्षी लपलेल्या आहेत. आॅलिम्पिक स्पर्धेत रजत व कांस्य पदक पटकावून देशाची मान उंचावणाऱ्या सिंधू, साक्षीमुळे अनेक पालकांना आपण एका मुलीचे बाप आहोत, याचा सार्थ अभिमान वाटत आहे. सातत्याने जनजागृती होत असल्याने, समाजाची मानसिक बदलत आहे. यासोबतच कायद्याचा धाक निर्माण करण्यातही यश आले आहे. त्यामुळेच शहरात मुलींचा जन्मदर समाधानकारक वाढला आहे. सोनोग्राफी सेंटरची नियमित तपासणी, ह्यपीसीपीएनडीटीह्ण कायद्याच्या अंमलबजावणीमुळेही सत्कारात्मक बदल दिसून येत आहे. डॉ. अविनाश लव्हाळे, आरोग्य उपसंचालक