-स्नेहा मोरे मुंबई : २००१ मध्ये राज्याचे लिंग गुणोत्तर ९१३ इतके होते. त्यामध्ये वर्ष २०११च्या जनगणनेनुसार घट होऊन ८९४ इतके कमी झाले. लिंग गुणोत्तरामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत पुरोगामी महाराष्ट्र २७व्या स्थानावर आहे. राज्यात सप्टेंबर २०२१ अखेरीस १०,१५६ सोनोग्राफी केंद्रांची या कायद्यांतर्गत नोंदणी झाली. या कायद्याच्या तरतुदींचा भंग करणाऱ्यांविरुद्ध एकूण ६०७ न्यायालयीन प्रकरणे वर्ष २०२०-२१ पर्यंत दाखल करण्यात आली आहेत, समर्थन अध्ययन केंद्राच्या अभ्यास अहवालातून ही बाब समोर आली आहे. जालना जिल्ह्यात सर्वाधिक वाढ२०१९मध्ये २०१८च्या तुलनेत दर हजारी मुलींच्या प्रमाणात बीड ८७, वाशिम ५३, हिंगोली ४१ने घट झाली आहे. तर जालनात लिंग गुणोत्तरात सर्वांत वाढ झाली असून हे प्रमाण १४३ने वाढले आहे. त्याचबरोबर गोंदिया ९२, गडचिरोलीत ४६ने वाढले आहे.प्रकरणे न्यायालयीन शिक्षा निर्दोष प्रलंबित माघार झालेली सुटलेली घेतलेलीजाहिरात करणे ३५ १ १२ २२ ०बनावट केस ४४ ११ २६ ७ ०नोंदणी नसणे ४७ १८ १६ १३ ०अपूर्ण अभिलेख ४४७ ७७ २४९ ११८ ३अन्य कारणे ३४ ६ १४ १४ ०एकूण ६०७ ११३ ३१७ १७४ ३असा आहे कायदाप्रसूतीपूर्व लिंग निदानासाठी होणाऱ्या दुरुपयोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (विनिमय व दुरुपयोग) प्रतिबंध कायदा १९९४ लागू करण्यात आला. प्रसूतीपूर्व लिंग निदान करून स्त्रीभ्रूणहत्या करणे हे स्त्रियांची अस्मिता व त्यांचा समाजातील दर्जा यास हानिकारक आहे. त्यासाठी असे गैरप्रकार करणाऱ्यांना कडक शिक्षा देण्यासाठी हा कायदा लागू केला आहे.२१ जिल्ह्यांत मुलींच्या संख्येत वाढराज्याचे २०१९ मध्ये लिंग गुणोत्तर ९१९ असल्याची नोंद आहे. तर दुसरीकडे २०१८च्या तुलनेत २०१९ साली राज्यात लिंग गुणोत्तरच्या प्रमाणात तीनने वाढ झाली आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी १४ जिल्ह्यांत मुलींची संख्या घटली, तर दिलासादायक बाब म्हणजे २१ जिल्ह्यांत मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे.
स्त्री भ्रूणहत्येत वाढ; जालना जिल्ह्यात सर्वाधिक वाढ; महाराष्ट्र देशात २७व्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 7:49 AM