शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

विवाहित पुरुषांच्या आत्महत्येत वाढ

By admin | Published: May 18, 2017 2:35 AM

पतीच्या जाचाला पत्नी बळी पडत असल्याच्या घटना वरचेवर ऐकायला मिळतात. परंतु आता पत्नीचा जाच पतीला सहन करत लागत असल्याचा दावा पुरुष हक्क संघटनेकडून

- स्नेहा मोरे । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पतीच्या जाचाला पत्नी बळी पडत असल्याच्या घटना वरचेवर ऐकायला मिळतात. परंतु आता पत्नीचा जाच पतीला सहन करत लागत असल्याचा दावा पुरुष हक्क संघटनेकडून होत आहे. देशभरात २१ वर्षांत तब्बल १० लाख ३३ हजार ९७६ विवाहित पुरुषांनी पत्नीकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला कंटाळून जीवन संपविले आहे.पुण्यात मराठी चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार, २०१५ मध्ये देशभरात तब्बल ६४ हजार ५३४ विवाहित पुरुषांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. तर २०१३, २०१४ साली अनुक्रमे ६४ हजार ०९८ आणि ५९ हजार ७४४ विवाहित पुरुषांनी आयुष्य संपविले. पत्नीच्या जाचामुळे पतीने आत्महत्या करण्याच्या घटना वाढत आहेत.२१ वर्षातील ही आकडेवारी पाहता त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वर्ष आत्महत्या१९९५ ३५,२४५२000 ४६,000२00५ ५२,४८३२0१0 ६१,४५३२0११ ६२,४00२0१२ ६३,३४३२0१३ ६४,0९८२0१४ ५९,७४४२0१५ ६४,५३४निराशेवर समुपदेशातून मात करणे शक्य मुली जशा आईवडिलांचे घर सोडून येतात तसेच मुलानेही लग्नानंतर आईवडिलांचे घर सोडून स्वतंत्र संसार थाटावा, अशी आजकाल अनेक मुलींची अपेक्षा असते. पतीकडून त्यांच्या कौटुंबिक, आर्थिक पातळीवर अनेक अपेक्षा असतात. अपेक्षापूर्ती न झाल्यास वाद होतात. अनेक निराश पती समुपदेशनाससाठी येतात. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना आलेले नैराश्य, कौटुंबिक कलह, पत्नीच्या एकाधिकारशाहीमुळे आलेला तणाव याची जाणीव होते. समुपदेशनामुळे त्यावर मात करणे शक्य होते.- डॉ. राजेंद्र बर्वे, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ