शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

शिक्षेचे प्रमाण वाढले, वेतनही वाढवा हो!

By admin | Published: July 06, 2014 12:42 AM

विधी सल्लागारांच्या येण्याने पोलिसांना कायदेशीर ज्ञानाचे बळ मिळाले, त्यांची दोषारोपपत्रे बिनचूक जाऊ लागली, पर्यायाने खटल्यांमधील शिक्षेचे प्रमाण वाढले. परंतु त्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विधी

विधी सल्लागारांचा टाहो : राज्यात साडेतीनशेवर पदे रिक्तराजेश निस्ताने - यवतमाळविधी सल्लागारांच्या येण्याने पोलिसांना कायदेशीर ज्ञानाचे बळ मिळाले, त्यांची दोषारोपपत्रे बिनचूक जाऊ लागली, पर्यायाने खटल्यांमधील शिक्षेचे प्रमाण वाढले. परंतु त्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विधी सल्लागारांचे वेतन मात्र आठ वर्षांपासून जैसे थेच आहे. सत्र न्यायालय आणि प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये चालणाऱ्या फौजदारी खटल्यात शिक्षेचे प्रमाण दहा वर्षांपूर्वी नगण्य होते. पोलिसांची सदोष दोषारोपपत्रे, सरकारी पक्ष-पोलीस-पंच साक्षीदारांमध्ये समन्वयाचा अभाव आदी बाबी त्यासाठी कारणीभूत ठरल्या होत्या. म्हणून सन २००६ पासून विधी सल्लागार आणि विधी निर्देशक ही दोन पदे निर्माण करण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयात विधी सल्लागार तर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात विधी निर्देशक बसविले गेले. कोणत्याही गुन्ह्याचे दोषारोपपत्र या विधी अधिकाऱ्यांच्या नजरे खालून जाऊ लागले. त्यातील चुका दुरुस्त होऊ लागल्या. त्याचा चांगला परिणाम न्यायालयीन खटल्यातील शिक्षेच्या प्रमाणावर दिसू लागला. न्यायालयात दाखल खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढण्यासोबतच फिर्यादी पक्षाला न्याय मिळावा यासाठी विधी सल्लागार झटताना दिसतात. परंतु आता या सल्लागारांवरच अन्याय होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. गेल्या आठ वर्षांपासून या सल्लागारांच्या वेतनात शासनाने एक रुपयाचीही वाढ केलेली नाही. सर्वत्र विनवण्या करूनही या सल्लागारांचा ना पगार वाढला ना कायम नियुक्ती मिळाली. पर्यायाने अनेक सल्लागार हे पद सोडून निघून गेले. राज्यात विधी सल्लागारांची ४७१ पदे मंजूर आहेत. आजच्या घडीला त्यातील केवळ शंभर-सव्वाशे पदे भरलेली आहेत. उर्वरित साडेतीनशेवर पदे रिक्त आहे. त्यात नागपूर, औरंगाबाद परिक्षेत्रात सर्वाधिक आहेत. ‘नियमित करा अथवा पगारवाढ द्या’ या मागण्यांना शासन प्रतिसाद देत नसल्याचे पाहून काही विधी सल्लागारांनी ‘मॅट’मध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय लवाद) धाव घेतली. तेथे या सल्लागारांच्या बाजूने निकाल लागला. म्हणून शासनाने ‘मॅट’च्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेथेही ‘मॅट’चा निकाल उचलून धरताना विधी सल्लागारांना दिलासा दिला गेला. आता शासनाने त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना शासनाने विधी सल्लागारांना नियमित करण्यासंबंधी सध्या कोणतेही धोरण नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले. तर दुसरीकडे सेवा प्रवेश नियमावली तयार करून त्यात सलग पाच वर्षे सेवा झालेल्या व्यक्तीला कायम नियुक्ती देता येईल, अशी तरतूद केली. या प्रकरणात आता १ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आमच्या परिश्रमामुळे खटल्यातील शिक्षेचे प्रमाण वाढले असताना आमच्या वेतनात वाढ का नाही, हा राज्यातील तमाम विधी सल्लागारांचा एकमुखी सवाल आहे.