संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ;  प्रतिवादी करण्याची कंगनाला उच्च न्यायालयाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 07:03 AM2020-09-23T07:03:51+5:302020-09-23T07:04:28+5:30

बेकायदा बांधकाम; पालिका प्रभाग अधिकाऱ्यालाही करता येणार प्रतिवादी

Increase in Sanjay Raut's difficulties; High Court allows Kangana to be a defendant | संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ;  प्रतिवादी करण्याची कंगनाला उच्च न्यायालयाची परवानगी

संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ;  प्रतिवादी करण्याची कंगनाला उच्च न्यायालयाची परवानगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पाली हिल येथील बंगल्यातील कथित अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केल्याने अभिनेत्री कंगना रनौत हिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता, खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने कंगनाला मंगळवारी दिली, तसेच पालिकेच्या एच/पश्चिम प्रभागाचे अधिकारी भगवंत लाटे यांनाही प्रतिवादी करण्याची मुभा दिली.


पालिकेने केलेली कारवाई बेकायदेशीर आहे. त्यामुळे पालिकेला व संबंधित अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी कंगनाने याचिकेत केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. जे. काथावाला व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठापुढे होती. कंगनातर्फे ज्येष्ठ वकील बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयात एक डीव्हीडी सादर केली. त्यात खासदार संजय राऊत यांचे एक भाषण रेकॉर्ड केलेले आहे. त्या भाषणात राऊत यांनी कंगनाला धमकी दिल्याचा दावा वकिलांनी केला. 


या डीव्हीडीचा आधार घेऊन अर्जदार युक्तिवाद करणार असेल, तर याचिकेमध्ये संजय राऊत यांनाही प्रतिवादी करणे आवश्यक आहे. कारण त्यांनाही बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी, असे न्यायालयाने म्हटले.


बाजू मांडण्याची संधी
‘मी हे विधान केलेच नाही आणि डीव्हीडी बनावट आहे, असे राऊत यांनी म्हटले तर? तुम्ही त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे,’ असे न्यायालयाने म्हटले, तसेच पालिकेच्या एच/पश्चिम प्रभागाचे अधिकारी भगवंत लाटे यांच्यावरही कंगनाने आरोप केल्याने त्यांनाही प्रतिवादी करण्याची मुभा न्यायालयाने कंगनाला दिली. 

Web Title: Increase in Sanjay Raut's difficulties; High Court allows Kangana to be a defendant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.