आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर/विजापूर : विजयपूरसह परिसरातील ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसात दमदार पाऊस झाला. त्याचबरोबर आलमट्टी धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. याचा परिणाम झाल्याने कृष्णा नदी पाणीपातळीत झपाटयाने वाढ होत आहे. शुक्रवारी आलमट्टी धरणाच्या २६ दरवाजांपैकी २० दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच जलविद्युत पेंद्रासाठी ४५ हजार क्यूसेक पाणी अतिरिक्त सोडण्यात येत आहे. त्यामुळे २९० मेगावॅट विजेचे उत्पादन सुरू झाले आहे. सध्या आलमट्टी धरणात जेवढे पाणी येत आहे. त्याच प्रमाणात धरणातून पाणी बाहेर सोडण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने कृष्णेची पाणी पातळी थोडी खालावली आहे. त्यामुळे धरणात येणारे पाण्याची आवक येथून पुढे कमी होणार आहे.विजयपूर जिल्ह्यातील भीमा नदीच्या पाण्याची पातळीत मात्र अद्यापही वाढच होत आहे.सोलापूरच्या उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी नदीचा प्रवाह ४.८० मीटर वरून ५.४० मीटर वाढल्याने सोन्न बॅरेजमध्ये ७० हजार क्यूसेक पाणी येत आहे. त्यामुळे या बॅरेजचे ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच तेवढेच पाणी धरणातून बाहेर सोडण्यात येत आहे. यामुळे भीमेच्या पाणी पातळीत अजूनही वाढण्याची शक्यता आहे, असे केएनएनएलचे अधिकारी के. एस. सालीमठ यांनी पत्रकारांना कळविले आहे. बºयाच वर्षानंतर विजयपूर जिल्हातील कृष्णा आणि भीमा या दोन्ही नद्या दुथडी भरून वहात आहेत. त्यामुळे या भागातील जनतेला शेतकरी आनंद झाला आहे.----------------पुराचा सामना करण्यास प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी के़ बी़ शिवकुमार बागलकोट जिल्ह्यातील मलप्रभा, घटप्रभा नद्यांपेक्षा कृष्णा नदीला प्रवाह अधिक असला तरी पुराचा कोणताही धोका नसून तरी पण खबरदारी म्हणून विजयपूर जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन पुराचा सामना करण्यास सज्ज असल्याची माहिती विजयपूर जिल्हाधिकारी शिवकुमार यांनी आलमट्टी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून सोडण्यात आलेले पाणी जमखंडी तालुक्मयातील हिप्परगी धरणातून पुढे आलमट्टी धरणाकडे जात आहे. आलमट्टीत पूर्ण क्षमतेची ५१९.६ मीटर पातळी ठेवून पाणी विसर्ग सुरू असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. पूर परिस्थितीचा सामना करण्याकरिता तालुकास्तरीय अधिकाºयांच्या बैठका घेण्यात आल्या असून प्रत्येक ठिकाणी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तालुक्यात कृष्णा पूरग्रस्त २७ खेडी असून त्यात तत्काळ होणाºया ११ खेडयांना प्राधान्य देऊन ९ बोटी, जलतरणपटू, सेफ्टी जॅकेट, स्थलांतर करावे लागल्यास त्यांना नित्य उपयोगी साहित्य पुरविण्याची तयारी असल्याची माहिती दिली.
पाण्याचा प्रवाह वाढल्याने आलमट्टी धरणाचे २० दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 7:31 PM
विजयपूरसह परिसरातील ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसात दमदार पाऊस झाला. त्याचबरोबर आलमट्टी धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे.
ठळक मुद्देआलमट्टी धरण परिसरात पावसाचा जोर कायम पुराचा सामना करण्यास प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी के़ बी़ शिवकुमार पूर परिस्थितीचा सामना करण्याकरिता तालुकास्तरीय अधिकाºयांच्या बैठका