शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
2
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
3
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
5
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
6
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
7
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
8
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
9
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
11
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
12
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
13
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
14
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
15
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
16
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
18
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
19
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
20
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...

तयार घरांना वाढती मागणी, दिवाळीत घरखरेदीकडे कल : बांधकामाधीन घरांना जीएसटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 4:51 AM

वस्तू व सेवा कराच्या कक्षेत येऊ घातलेल्या रिअल इस्टेट मार्केटला दिवाळीच्या मुहूर्तावर चांगलीच झळाळी आली आहे. ओसी मिळालेली व तयार स्थितीत असलेली घरे जीएसटीच्या कक्षेतून बाहेर असल्याने तया घरांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

 मुंबई : वस्तू व सेवा कराच्या कक्षेत येऊ घातलेल्या रिअल इस्टेट मार्केटला दिवाळीच्या मुहूर्तावर चांगलीच झळाळी आली आहे. ओसी मिळालेली व तयार स्थितीत असलेली घरे जीएसटीच्या कक्षेतून बाहेर असल्याने तया घरांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. याउलट बांधकाम सुरू असलेल्या घरांच्या बुकिंगसाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकासकांकडून विविध आॅफर्सची प्रलोभने दाखवली जात आहेत.विकासकांची संघटना असलेल्या नरेडकोचे उपाध्यक्ष राजन बांदेलकर यांनी सांगितले की, जीएसटीच्या कक्षेतून बाहेर असलेल्या तयार घरांना ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. याउलट बांधकाम सुरू असलेल्या घरांवर जीएसटीचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. जीएसटीमुळे घरांच्या किमती कमी होण्याचा सरकारचा दावा आहे. मात्र तसे प्रत्यक्षात दिसत नाही. याउलट रेरामुळे घरांच्या विक्रीला दिवाळीत चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेरा रजिस्ट्रेशन क्रमांकामुळे ग्राहकांमध्ये विकासकांप्रतिचा विश्वास वाढल्याचे दिसत आहे. मात्र रेरानंतर उभारी घेणारे रिअल इस्टेट क्षेत्राचे जीएसटीमुळे पुन्हा कंबरडे मोडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, जीएसटीचा परिणाम जाणवू नये, म्हणून विकासकांकडून घरांच्या बुकिंगवर मोठ्या प्रमाणात आॅफर्स देण्यात येत आहेत. त्यात रजिस्ट्रेशन मोफत करण्यापासून गृहोपयोगी वस्तू, दुचाकी, चारचाकी आणि इतर अनेक सोयी-सुविधा पुरवण्याची तयारी विकासक दाखवत आहेत. बहुतेक विकासकांनी कमी व्याजदरावर गृहकर्ज पुरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नोटाबंदीनंतर बराच काळ थंडावलेल्या रिअल इस्टेटचा बाजार आता कुठे गरम होऊ लागला आहे.

टॅग्स :HomeघरMumbaiमुंबई