शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2016 12:53 AM

भोसरी येथील गोल्डमॅन दत्तात्रय फुगे यांच्या खूनप्रकरणी दिघी पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांची पोलीस कोठडी

पिंपरी : भोसरी येथील गोल्डमॅन दत्तात्रय फुगे यांच्या खूनप्रकरणी दिघी पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांची पोलीस कोठडी, तर दोघांची न्यायालयीन कोठडी संपल्याने पुन्हा त्यांना गुरुवारी खडकी न्यायालयात गुरुवारी हजर केले. या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सर्व आरोपींना सोमवारपर्यंत (२५ जुलै) पोलीस कोठडी सुनावली आहे. दत्तात्रय फुगे यांचा दिघी येथे १४ जुलैला रात्री साडेअकराच्या सुमारास टोळक्याने दगडाने ठेचून निर्घृण खून झाला. फुगे यांना मित्राच्या वाढदिवसाचे निमित्त करून दिघी येथे बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्यावर तलवार, कोयता, चॉपरने वार करण्यासह डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. खुनातील सर्व मारेकरी फरार झाले होते. याप्रकरणी फुगे यांचा मुलगा शुभम फुगे (२१, रा. भोसरी) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिघी पोलिसांनी तपास करून पहिले पाच आणि नंतर चार आरोपींना अटक केली. यामध्ये अतुल अमृत मोहिते (२५), सुशांत जालिंदर पवार (२०), अतुल ऊर्फ बल्ली कैलास पठारे (२४, रा. म्हस्के वस्ती, आळंदी रोड), शैलेश सूर्यकांत वाळके (२६, रा. यमाईनगर, दिघी), विशाल दत्ता पारखे (३२, रा. विश्रांतवाडी), निवृत्ती ऊर्फ बाळू किसन वाळके (४५, विठ्ठल मंदिराजवळ, दिघी) आणि प्रेम ऊर्फ कक्का ऊर्फ प्रमोद संताराम ढोलपुरिया (२३, रा. रामनगर, बोपखेल) यांना अटक करून पोलीस कोठडी सुनावली होती. सूत्रधार शोधण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)