शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
4
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
6
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
7
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
8
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
9
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
10
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
11
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
12
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
13
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
14
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
15
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
16
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
17
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
18
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
19
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
20
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...

वाढीव वीजपुरवठ्याचा महावितरणला भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 4:40 AM

दोन वर्षांत ३,५०० कोटींचे नुकसान; अपेक्षित पुरवठ्यापेक्षा जास्त विजेची खरेदी

- संदीप शिंदे मुंबई : विजेच्या वाढत्या मागणीत वाढ झाल्यामुळे २१ हजार ५७० मेगावॅटचा विक्रमी पुरवठा केल्याचे सांगत, महावितरणने स्वत:ची पाठ थोपटून घेतली असली, तरी अशा स्वरूपाच्या वीजपुरवठ्यामुळे महावितरणला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. एप्रिल, २०१७ ते मार्च, १८ पर्यंत हा तोटा दोन हजार कोटी रुपये होता. तर, एप्रिल, २०१८ ते फेब्रुवारी, २०१९ पर्यंत तो दीड हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता, अशी माहिती हाती आली आहे.महावितरणने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक१८ हजार २५० मेगावॅट वीजपुरवठा केला होता. बुधवारी विजेची मागणी तब्बल ३ हजार २०० मेगावॅटने वाढली. वाढीव वीजखरेदी करण्याची तरतूद महावितणने केली असल्याने, भारनियमनाचे चटके राज्यातील जनतेला सोसावे लागले नाहीत. मात्र, या अतिरिक्त वीजखरेदीसाठी महावितरणला जास्त पैसे मोजावे लागतील. त्याची वसुली नियमित बिलांमध्ये होत नाही आणि वितरण व्यवस्थेतील गळतीही वाढते. त्यामुळे वीजखरेदीचा खर्च आणि वसुली यांच्यातील तफावत वाढते आणि पर्यायाने महावितरणच्या तोट्यातही वाढ नोंदविली जाते.गेल्या दोन वर्षांत अशाच स्वरूपाच्या वाढीव मागणीमुळे अपेक्षित वीजपुरवठ्यापेक्षा जास्त वीजखरेदी झाली. त्यातून महावितरणाला तब्बल साडेतीन हजार कोटींची तूट सहन करावी लागली, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. वीज नियामक आयोगाला सादर केलेल्या दरवाढीच्या प्रस्तावातही त्याचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.सर्वाधिक थकबाकी कृषिपंपांचीवाढते तापमान आणि कृषिपंपांचा वाढलेला वापर, यामुळे मागणीत विक्रमी वाढ नोंदविण्यात आली. कृषिपंपांना सरासरी १ रुपये ८० पैसे प्रति युनिट दराने पुरवठा होता. वीजखरेदीसाठी सरासरी चार रुपये प्रति युनिट, तर वितरणासाठी अडीच रुपये खर्च होतात. राज्यात सर्वाधिकथकबाकी कृषिपंपांची असून, या अतिरिक्त वीजपुरवठ्यामुळे त्यात आणखी भर पडेल. याशिवाय विजेची मागणी वाढल्यास वितरणातील तूटही वाढते. त्याचाही भार महावितरणला सोसावा लागत आहे. मागणी वाढली, तर ती भागविण्याची क्षमता महावितरणकडे आहे, परंतु त्यापोटी होणारा खर्च मात्र भरून काढला जात नाही. हे व्यस्त प्रमाण व्यावसायिक आघाडीवर परवडणारे नसल्याचे मत वीज क्षेत्रातील अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण