शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

आयटीआयच्या तासिका निदेशकांच्या मानधनात वाढ, कौशल्य विकासमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 1:48 AM

आता तासिका मानधन २५० रु. तर प्रात्यक्षिक तासिकेच्या मानधनात १२५ रुपये करण्यात आल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सैद्धांतिक व प्रात्यक्षिक तासिकेसाठी निदेशकांस पूर्वी प्रत्येकी ७२ रु. व ३६ रु. दिले जात होते. आता तासिका मानधन २५० रु. तर प्रात्यक्षिक तासिकेच्या मानधनात १२५ रुपये करण्यात आल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.महाराष्ट्र राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातील आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्याच्या दृष्टीने, तसेच तेथील प्रशिक्षणार्थींना उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी तासिका तत्त्वावर प्रशिक्षित व अनुभवी निदेशक उपलब्ध करून दिले जातात. औद्योगिक क्षेत्रातील जागतिकीकरण विचारात घेता, कुशल मनुष्यबळाची गरज वाढलेली आहे. त्यास अनुसरून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून शिल्पकारागीर योजनेसोबत विविध योजना राबविण्यात येत आहेत, तसेच आधुनिक तंत्रज्ञावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत, असेही पाटील निलंगेकर म्हणाले.यासाठी तासिका तत्त्वावर आवश्यक निदेशकांची गरज पाहता पूर्वी मानधन फार कमी होते. त्यामुळे उत्तम प्रतीचे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षक निदेशक त्वरित उपलब्ध होत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ही वाढ केली असून, आता तासिका तत्त्वावर उत्तम प्रशिक्षित निदेशक उपलब्ध होणार आहेत. त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होणार असून, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दर्जा वाढण्यास याची मदत होईल, असे पाटील निलंगेकर यांनी सांगितले.साडेचार कोटी युवकांना प्रशिक्षणभारत सरकारने मेक इन इंडिया व स्किल इंडिया या प्रमुख योजनांद्वारे सन २०२२ पर्यंत ५० कोटी युवकांना प्रशिक्षित करण्याचे ठरविले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन ‘कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ या धोरणांतर्गत सन २०२२ पर्यंत साडेचार कोटी युवकांना प्रशिक्षित करणार असल्याची माहिती पाटील निलंगेकर यांनी दिली.

टॅग्स :Educationशिक्षण