शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

इंदापूरच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; हर्षवर्धन पाटलांच्या भावाचा प्रवीण मानेंना जाहीर पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 4:33 PM

मयूर पाटील यांनी साथ सोडल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

Indapur Assembly Constituency :इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत प्रवीण माने यांनी वेगळी चूल मांडली होती. हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूर पाटील यांनी त्यांची साथ सोडली आहे. मयूर पाटील यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला आहे.

मयूर पाटील यांनी साथ सोडल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून इंदापूरातील राजकारण सातत्याने बदलत आहे. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर प्रवीण माने, भरत शहा आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवार गटाची साथ सोडली होती. त्यानंतर आता मयूर पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडत परिवर्तन विकास आघाडीच्या प्रवीण माने यांना पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे  आप्पासाहेब जगदाळे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती मयूर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत प्रवीण माने यांना पाठिंबा दिला. इतर उमेदवारांच्या तुलनेत प्रवीण माने यांना जनतेचा जास्त पाठिंबा आहे. आताचे उमेदवार मलिन प्रतिमेचे आहेत आणि लोकांना आता बदल हवा आहे. जनता आता आजी माजी उमेदवार नको असं म्हणत आहे. जे विचार घेऊन मी काम करत होतो त्यांना तिलांजली देण्याचे काम आमच्या घरातल्या लोकांनी केले. त्यामुळे तालुक्याची विल्हेवाट लागायला लागली आहे. सहकारी संस्था हुकूमशाही पद्धतीने चालवण्यात आल्या. आम्ही काम करत होतो तेव्हा वरुन आदेश आल्याशिवाय काही होत नव्हतं. त्यांनी मंत्रि‍पदाचा, आमदाराकीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी करणं आवश्यक होतं. पण तसं चित्र दिसलं नाही, अशी टीका मयूर पाटील यांनी केली.

दरम्यान, इंदापूरची विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यात होईल असं सुरुवातीपासून वाटत होतं. प्रवीण माने यांच्या बंडखोरीने ट्विस्ट आला. गेल्या निवडणुकीत प्रवीण माने हे दत्ता भरणेंसोबत होते. त्यानंतर आता अपक्ष उमेदवारी दाखल करत प्रवीण माने यांनी सर्वांना धक्का दिला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024indapur-acइंदापूरSharad Pawarशरद पवार