शहरं
Join us  
Trending Stories
1
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
2
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?
3
ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती
4
Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
5
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
6
“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले
7
Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव
8
रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी
9
T20 World Cup 2024 : 'स्वप्न'पूर्तीसाठी टीम इंडिया सज्ज! 'मन' खूप झालं आता 'जग' जिंकण्यासाठी हरमन है तय्यार
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
11
शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI
12
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
13
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
14
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
15
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
16
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
17
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
18
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
19
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
20
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या

इंदापुरात तणाव, दगडफेक

By admin | Published: August 08, 2014 11:15 PM

सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाई फेकल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आज इंदापूर तालुक्यात पडले. यामुळे तणाव निर्माण झाला होता.

 बाजारपेठा बंद : हषर्वधन पाटील यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेचा निषेध

 
इंदापूर :  सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाई फेकल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आज इंदापूर तालुक्यात पडले. यामुळे तणाव निर्माण झाला होता. काही ठिकाणी दगडफेकीच्याही घटना घडल्या.   
पाटील यांच्यावर शाई फेकल्याचे समजताच भिगवणमध्ये मोठा तणाव निर्माण झाला.  थोडय़ाच वेळात संपूर्ण भिगवण बंद झाले. त् काँग्रेस कार्यकत्र्यानी भिगवण ग्रामपंचायत कार्यालयासमोर रास्ता-रोको आंदोलन केले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी सभापती रमेश जाधव, कर्मयोगीचे संचालक यशवंत वाघ, भिगवणचे सरपंच पराग जाधव, रणजित भोंगळे, संजय रायसोनी, पिंटू काळे, शिवाजीराव कन्हेरकर, सुनील काळे व कार्यकर्ते  उपस्थित होते. 
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव म्हणाले, ‘‘आजची घटना भ्याड आहे. आमच्या नेत्यांवर शाई फेकण्यासारखी कृत्ये कोणी करीत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. पाटील यांची राज्यातील नावलौकीक कामगिरी पाहवत नसल्याने काही समाजकंटक अशी कृत्ये करीत आहेत. ’’
या वेळी पुणो-सोलापूर महामार्ग ते मदनवाडी चौफुला ते तक्रारवाडी व भिगवण असा निषेध मोर्चा काढण्यात आला. य् त्यानंतर शिवाजी चौक येथे निषेध सभेची सांगता झाली. 
इंदापूर  शहरात महामार्गावर टायर पेटवून देण्यात आले होते. काँग्रेसने झालेल्या प्रकाराचा निषेघ केला आहे. इंदापूरचे नगराध्यक्ष अशोक इजगुडे, उपनगराध्यक्ष भरत शहा, प्रा. कृष्णा ताटे, शेखर पाटील, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रमोद राऊत, अॅड. गिरीश शहा, दीपक जाधव, शेरखान पठाण, विजय वाघमोडे, मुकुंद शहा आदी कार्यकत्र्यासह माया विंचू, ऋतुजा पाटील, सीमा कल्याणकर महिला कार्यकत्र्या रस्त्यावर उतरल्या. कार्यकत्र्यानी शहर बंदचे आवाहन केले. शहर बंद केल्यानंतर या सर्व कार्यकत्र्यासह शेकडो कार्यकत्र्यानी पुणो-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पंचायत समिती समोर ठिय्या मांडला. 
या वेळी भाषणो करताना धनगर समाजाचे आरक्षण ही कायदेशीर प्रक्रिया आहे. आमच्या नेत्यांसह आम्ही कार्यकर्ते आरक्षण व्हावे, अशा मतांचे आहोत. त्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र, ते मागण्याचा मार्ग शांततेचा असावा.  पाटील यांची आरक्षण मिळावे, अशी भूमिका आहे. तरी देखील त्यांच्यावर चाल करण्याचा, शाई फेकण्याचा प्रकार झाला. तो निंदनीय आहे, असे मत प्रा. कृष्णा ताटे, अशोक इजगुडे, भाऊसाहेब चोरमले, सीमा कल्याणकर यांनी मांडले. यानंतर कार्यकत्र्यानी घोषणाबाजी करत इंदापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. तेथे निवेदन सादर केले. हा प्रकार करणा:या व षडयंत्र रचणारांवर त्वरित कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
अंथुण्रे परिसरात कडकडीत बंद
अंथुण्रे : अंथुर्णे व भरणोवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध व्यक्त केला. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने 
 
सहकारमंत्र्यांच्या बावडा गावात निषेध
बावडा : बावडा येथे संतप्त कार्यकत्र्यानी इंदापूर-अकलूज रस्त्यावर टायर जाळत निषेधाच्या घोषणा देऊन रस्ता रोको आंदोलन केले. मोठय़ास ंख्येने  
कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यामुळे पोलीस खात्याची तारांबळ उडाली. मात्र  पाटील यांचे बंधू उदयसिंह पाटील यांनी धाव घेवून कार्यकत्र्याना शांत राहण्याचे आवाहन केले. 
आज आठवडा बाजार दिवस होता. मात्र हे वृत्त धडकताच गावात सर्वत्र पळापळ झाल्याने बाजारकरी देखील आपले साहित्य गुंडाळून निघून गेले. दिवसभर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. बावडा येथील छत्रपती शाहू चौकात हे आंदोलन करण्यात आले. 
या वेळी ज्येष्ठ नेते प्रशांत पाटील, उपसरपंच धैर्यशील पाटील यांनी कार्यकत्र्याना शांततेचे आववाहन केले. या वेळी नीरा-भीमा साखर कारखान्याचे संचालक विकास पाटील, किरण पाटील, अंकुशराव घाडगे, शंकरराव घाडगे, राजेंद्र घोगरे, विजय घोगरे यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होते. 
तसेच वकीलवस्ती, सुरवड, भोडणी या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. नीरा-भीमा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विलासराव वाघमोडे यांनीही या घटनेचा निषेध करून कार्यकत्र्यानी संयम बाळगावा, असे आवाहन केले.
भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुका अध्यक्ष अण्णासाहेब तोरणो, रणधीर भोसले, विजयराव भोसले आदींनीही या घटनेचा निषेध केला.