संगमनेर(अहमदनगर) : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीरांनी दिलेली आहुती विसरून चालणार नाही. कारण त्यांच्या त्यागामुळेच स्वतंत्र भारताला सन्मान मिळाला, असे प्रतिपादन माजी राष्ट्राध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी केले.पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी पाटील म्हणाल्या, प्रत्येकात असामान्य बनण्याची शक्ती आहे. स्वत:मधील ताकद ओळखल्यास समृद्ध महाराष्ट्र घडू शकतो. महात्मा गांधींनी जातीयतेच्या भिंती मोडून शांतता व अहिंसेचा मंत्र दिला. स्वातंत्र्यलढ्यात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी काम केले. पाटील यांच्या हस्ते सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्काराने ज्येष्ठ संशोधक डॉ. मधुकर चव्हाण, तर जिल्हास्तरीय सहकाररत्न पुरस्काराने मुरलीधर खताळ यांना सन्मानित करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. (प्रतिनिधी)
‘स्वातंत्र्यवीरांमुळे स्वतंत्र भारताचा सन्मान’
By admin | Published: January 12, 2015 3:01 AM