शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 2:44 PM

Sangli Vishal Patil News: लोक आता भाजपच्या सत्तेला पूर्णपणे हद्दपार करणार आहेत. विरोधकांची पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका विशाल पाटील यांनी केली.

Sangli Vishal Patil News: भाजपाला पराभव दिसू लागला आहे. माझ्या मागे लाखो अदृश्य हात आहेत. हे हात निकालापर्यंत आणि निकानंतरही माझ्यासोबत राहतील. माझा जनतेवर विश्वास आहे. जनतेने ठरवले आहे. विजय माझा नाही, जनतेच्या उद्रेकाचा विजय होणार आहे. प्रचंड मताधिक्क्याने मी १०० टक्के विजय होणार आहे. काँग्रेसवर प्रेम करणारे प्रत्येक कार्यकर्ते नेते मनाने माझ्याबरोबर आहेत. विशाल पाटील आपलाच उमेदवार आहे अशी लोकांच्या मनात भावना आहेत, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. 

सांगली जागेवर काँग्रेसने दावा केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अचानक जाहीरपणे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली. यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाला. शेवटपर्यंत चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी मागे न घेतल्यामुळे विशाल पाटील यांनी पक्षादेशाविरोधात जात अपक्ष म्हणून अर्ज भरला. आता विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस कारवाई करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रचारसभेत बोलताना, विश्वजीत कदम हे राज्याचे नेते आहेत. काँग्रेस पक्षाचे भविष्य आहेत. निकाल काहीही लागो, आम्ही विश्वजीत कदम यांचे नेतृत्व शेवटपर्यंत मान्य करणार आहोत, असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

आम्ही वसंतदादांच्या विचारांची लोक आहोत. एकदा निर्णय घेतला की, त्यावर ठाम राहतो. मागील लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारीमुळे मला पराभव स्वीकारावा लागला. मात्र या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. काँग्रेसवर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि नेते माझे काम करत आहे. ते कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत, असे विशाल पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघात माझ्या बाजूने वारे निश्चितपणे फिरले आहे. या वाऱ्याचे आता वादळ झाले आहे. त्यामुळे लोक आता भाजपच्या सत्तेला पूर्णपणे हद्दपार करणार आहेत. भाजपला पराभव दिसू लागला आहे. राज्यातील आणि देशातील नेते सांगलीत येऊन अपक्ष उमेदवारावर बोलतात. यातूनच कळते की, विरोधकांची पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका विशाल पाटील यांनी केली. 

 

टॅग्स :vishal patilविशाल पाटीलsangli-pcसांगलीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४