पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) ५ नगरसेवक भाजपाच्या तिकीट व कमळ चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे कागदोपत्री ते भाजपाचे नगरसेवक आहेत; मात्र त्यांच्याकडून रिपाइंचा स्वतंत्र गट म्हणून म्हणून विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला विभागीय आयुक्त कायदेशीर मान्यता देणार का, याकडे लक्ष लागले आहे.महापालिका निवडणुकीमध्ये रिपाइंच्या १० उमेदवारांनी भाजपाचे कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढविल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. शहर कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली होती. भाजपाच्या चिन्हावर लढलेले रिपाइंचे ५ नगरसेवक निवडून आले आहेत. सोमवारी रिपाइंच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली. पक्षाचे स्वतंत्र अस्तित्त्व कायम ठेवण्यासाठी रिपाइंकडून स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले, ‘‘निवडणूकपूर्व समझोत्यानुसार रिपाइंच्या ५ नगरसेवकांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यावी, असे पत्र त्यांना दिले आहे. लोकांपर्यंत चिन्ह पोहोचणे सोपे व्हावे म्हणून रिपाइंच्या उमेदवारांनी कमळ चिन्ह घेतले होते.’’रिपाइंला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिल्यास त्यांना पालिकेत गटनेते पद, स्वतंत्र दालन आदी सुविधा मिळू शकणार आहेत. भाजपाचा व्हिप रिपाइ सदस्यांवर लागू असणार नाही.रिपाइंला उपमहापौरपदद्यावे : संजय काकडेउपमहापौरपद रिपाइंला द्यावे अशी आग्रही मागणी खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. रिपाइं (आठवले गट) बरोबर युती झाल्याने भाजपाला फायदाच झाला. कमळाच्या चिन्हावर लढून रिपार्इंचेही पाच नगरसेवक निवडून आले. देशासाठी डॉ. आंबेडकरांचे योगदान मोठे आहे. केंद्र सरकारमध्ये रामदास आठवले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात घेतले. त्याच धर्तीवर पुण्यातही रिपाइंला उपमहापौर पद देण्यात यावे, अशी मागणी काकडे यांनी केली आहे.गटनेतेपर्दी धेंडे भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेल्या रिपाइंच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीमध्ये गटनेतेपदी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सिद्धार्थ धेंडे यांची निवड करण्यात आली आहे.
रिपाइंचा पालिकेत स्वतंत्र गट
By admin | Published: March 07, 2017 12:58 AM