Shraddha Murder Case:श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच हे तुकडे एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकण्यात आले होते. या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटताना दिसत असून, श्रद्धाच्या वडिलांनी या हत्येमागे ‘लव्ह जिहाद’ची शंका उपस्थित केली आहे. राजकीय नेतेही यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. यातच अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana)
आफताब आणि श्रद्धा हे दोघेही २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होते. श्रद्धाच्या घरच्यांना आफताबसह असलेले तिचे संबंध मान्य नसल्यामुळे त्यांनी २०१९मध्ये त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली होती. काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर सक्रिय नसल्याने श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी ६ ऑक्टोबर रोजी पोलीस स्थानकामध्ये तत्कार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आफताबला २६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलवले. त्यावेळी त्याने श्रद्धा २२ मे रोजी घर सोडून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र आफताबने त्यापूर्वीच म्हणजेच १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली होती. हे नंतर स्पष्ट झाले. दिल्लीमध्ये राहण्यासाठी आल्यानंतर श्रद्धाने लग्नाचा तगादा लावल्याने आफताबने तिचा खून केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी राज्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा आणावा, अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे.
राज्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा आणावा
श्रद्धाचा खून अत्यंत क्रूरपणे करण्यात आली. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणे, ते फ्रिजमध्ये ठेवणे आणि रोज एक एक जंगलात नेऊन फेकणे, हे सर्व धक्कादायक आहे. श्रद्धावर अत्यंत विक्रृतपणे अत्याचार करण्यात आले आहे. या घटनेचा मी निषेध करतो. श्रद्धाची हत्या करणाऱ्या आरोपीला थेट फाशीची शिक्षा दिली पाहिजे. ज्याप्रकारे उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहादसाठी कायदा बनवण्यात आला आहे. त्या कायद्याच्या अंमलबजावणी महाराष्ट्रात केली पाहिजे. हा मुद्दा मी येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात मांडणार असल्याचे रवी राणा यांनी सांगितले.
दरम्यान, श्रद्धा हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताबला दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले. वकिलांनी आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली आहे. तसेच दिल्ली पोलिसांनीही नार्को टेस्टला मान्यता दिली आहे. आफताबनेही नार्को टेस्ट करण्यास संमती दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"