ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २४ - स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ते व विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य आघाडी (विरा) या राजकीय पक्षाची शनिवारी घोषणा केली. या पक्षाची लवकरच राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात येईल. यानंतर आगामी स्थाानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भ राज्य आघाडीतर्फे (विरा) लकडगंज येथील टिंबर भवन येथे विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी उपरोक्त घोषणा केली.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यावर आपण कधीपर्यंत काँग्रेस व भाजपाच्या भरवश्यावर राहणार ? आता आपल्यालाच सत्ता मिळवून स्वतंत्र राज्य निर्माण करून घ्यावे लागले. त्यासाठी विदर्भाची नवीन लीडरशीप निर्माण करण्याची गरज आहे. ते राजकीय पक्षाचा पर्यान निर्माण केल्यानेच होईल. लवकरच स्थानिक स्वरज्य संस्थांचा निवडणुका येत आहेत. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे. आम आदमी पार्टीने जशी चुक केली, तसे करणार नाही, असे स्पष्ट करीत विदर्भ राज्य आघाडी या निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करेल. परंतु सर्वच जागा लढवणार नाही. जया जागांवर शक्य आहेत. त्याच जागा लढणार. इतर विदर्भवादी राजकीय पक्षांसोबत आघाडी किंवा उमेदवार उभे करतांना तडजोड सुद्धा करता येईल, असेही त्यांनी सांगितले. मराठा समाजाच्या मोर्चासंदर्भात अॅड. अणे यांना पत्रकारंनी विचारले असता ते म्हणाले, त्यांना आरक्षण मिळायला हवे, परंतु आरक्षणासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण हे निकष हे. तेव्हा या निकष तपासून पाहावे व त्यांना आरक्षण द्यावे. दुसरा मुद्दा अॅट्रोसिटीचा आहे. अॅट्रोसिटी कायद्याचा कधीकधी दुरुपयोग होतो, ही बाब खरी असली तरी एकच समाज सातत्याने जातीय अत्याचाराला बळी पडत आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.