पुणे : काळानुसार विद्यार्थी आणि पालक पारंपरिक अभ्यासक्रमांशिवाय वेगळ्या अभ्यासक्रमांचा विचार करू लागले आहेत. दहावी-बारावीनंतर कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करावी, घराजवळच रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध होईल का? याचा शोध घेत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थीही करिअर निवडीबाबत गोंधळेले आहेत. त्यामुळे शासनाने व स्वयंसेवी संस्थांनी करिअर निवडीबाबत स्वतंत्र पोर्टल सुरू केले आहे.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, श्यामची आई फाउंडेशन आणि महाकरिअरच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली. विद्यार्थ्यांचा कल कोणत्या दिशेला आहे, याबाबत माहिती उपलब्ध करून दिली. आपला कल कोणत्या दिशेला आहे, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले असले, तरी अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. त्या उद्देशानेच महाकरिअर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)हेल्पलाइनवर विचारा प्रश्न४महाकरिअरमित्र या पोर्टलवर राज्यातील सर्व जिल्ह्यांतील शैक्षणिक संस्थांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, हेल्थ सायन्स यासह इतरही क्षेत्रातील कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी कोणते व्होकेशनल कोर्स, पदविका, पदवी, प्रमाणपत्र कोर्स करावेत, याचे मार्गदर्शन महाकरिअरमित्रच्या माध्यमातून केले जात आहे. कलचाचणीचा निकाल प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना आणि इतरही विद्यार्थी 8275100001 या हेल्पलाईनवर विविध प्रश्न विचारता येऊ शकतात.यवतमाळ, नंदुरबार, भंडारा यासह सर्व जिल्ह्यांमधील विद्यार्थीसुद्धा या हेल्पलाइनचा लाभ घेऊन करिअर निवडीबाबत मार्गदर्शन घेऊ शकतात. विद्यार्थ्यांनी त्यांचा परीक्षा क्रमांक ६६६.ेंँं१ंूं१ीी१े्र३१ं.्रल्ल या संकेतस्थळावर टाकल्यास त्यांच्या कलानुसार अनेक अभ्यासक्रम दिसतात. त्यातून विद्यार्थी करिअर निवडू शकतात.- शीतल बापट, संस्थापक श्यामची आई फाउंडेशनमहेश चोथे यांच्या नियंत्रणाखाली करिअर कौन्सिलर हेल्पलाइनवरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. ३ मे रोजी ही हेल्पलाइन सुरू झाली असून, दररोज शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना पुण्यातील केंद्रातील कौन्सिलर मार्गदर्शन करतात.-भगवान पांडेकर, समन्वय, महाकरिअरमित्र
करिअर निवडीसाठी स्वतंत्र पोर्टल
By admin | Published: May 12, 2016 1:36 AM